|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » कोंढवा दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अजित पवार

कोंढवा दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अजित पवार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुण्यातील कोंढवा दुर्घटनेपूर्वी खोदाई सुरु असतानाच संबंधित सोसायटीच्या नागरिकांनी महापालिका आणि पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वेळीच नागरिकांची या तक्रारीची दखल घेतली असती तर 15 मजूरांना आपला जीव गमवावा लागला नसता. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

अजित पवार म्हणाले, पैशाच्या हव्यासापोटी बिल्डर इमारतींमध्ये पर्किंगसाठी बेसमेंट तयार करतात. त्यामुळे इतर बांधकामाला धोका पोहचतो. चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणाऱया व्यावसायिकांवर चाप बसवण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. कोंढवा दुर्घटना प्रकरणात मृत्यू पावलेल्या मजुरांची नोंद नसल्याने मृत मजुरांना मदत करताना अडचण निर्माण झाली.बांधकाम व्यावसायिकांनी मजुरांच्या नावाची नोंद का केली हा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

Related posts: