|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » रोहित शर्मा चा वर्ल्ड कप मध्ये ‘विक्रमांचा चौकार’

रोहित शर्मा चा वर्ल्ड कप मध्ये ‘विक्रमांचा चौकार’ 

ऑनलाइन टीम /लंडन : 

रोहित शर्माने दमदार खेळी करत विश्वचषक स्पर्धेतील बांग्लादेशच्या सामन्यात चौथे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 26 वे शतक साजरे केले आहे. रोहित शर्माने 92 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 104 धावा केल्या आहेत. भारतीय टीम कडून एकाच वर्ल्ड कपमध्ये चार शतके बनविणारा रोहित पहीला फलंदाज ठरला आहे.

बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यात रोहीत ने 29 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आपले शतक पूर्ण केले. या शतकासह त्याने कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली. संगकाराने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये चार शतके झळकाविली आहेत. रोहितने या खेळीमध्ये विश्वचषक स्पर्धेतील 500 चा धावांचा टप्पा गाठला. या आधी हा विक्रम सचिनने 1996 आणि 2003 च्या विश्वचषकामध्ये केला होता. रोहित हा विक्रम करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने 2011 साली सचिनने केलेल्या 482, सौरभ गांगुलीने 2003 च्या विश्वचषकात केलेल्या 465 आणि राहुल द्रविडने 1999 साली केलेल्या 461 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

याचबरोबर रोहित शर्मा ने भारतीय टीमकडून सर्वात जास्त सिक्स व चौकार मारण्याचे रेकॉर्ड केले आहे. रोहितने सर्वात जास्त म्हणजेच 230 सिक्स व 53 चौकार मारले आहेत.

 

Related posts: