|Monday, September 23, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

गुरुपौर्णिमा : कृतज्ञताक्यक्त करण्याचा दिवस

बुध. दि. 3 ते 9 जुलै 2019

‘श्रीकृष्णप्रिया तुळशी’ या वॉटसऍप ग्रुपमध्ये आलेला एक विचार…. वृद्धाश्रमात ठेवलेल्या आईवडिलांचे निधन झाल्यास नातेवाईकांनी किती दिवस सुतक पाळायचे असा प्रश्न स्वामी विवेकानंदांना एकाने विचारला. त्यावर स्वामीनी सांगितले की, त्याला कायमचेच सुतक लागते. त्याला मंदिरात जाण्याचा अथवा देवधर्मासह कोणतीही मंगलकार्ये करण्याचा अधिकार रहात नाही. कृतज्ञता व कृतघ्नता यावर हे फार सुंदर उत्तम आहे. जगातील सर्व प्राणीमात्र एकमेकांवर अवलंबून आहेत. कुणाचीही मदत नसताना मी माझ्या स्वत:च्या हिमतीने वर आलो, एकटाच सर्व प्रगती करू शकतो, असे कुणी म्हणू शकत नाही. माणसाने सर्वाविषयी कायम कृतज्ञ राहीले पाहिजे, हे शिकविणारी तिथी म्हणजे आषाढी पौर्णिमा. तिलाच गुरुपौर्णिमा अथवा  व्यासपौर्णिमा असे म्हणतात. येत्या 16 जुलैरोजी गुरुपौर्णिमा आहे. व्यासमुनींना सर्व श्रे÷ गुरु मानलेले आहे. त्यादिवशी त्याचे पूजन करतात. गणेश, महादेव, आकाशातील चंद्र सूर्यासह सर्व तारे तसेच चराचर सृष्टीला गुरुस्थानी मानलेले आहे. सर्वश्रे÷ गुरु म्हणजे माता- पिता हेच आहेत. रोज सकाळी उठून त्यांच्या पाया पडून  त्यांचा आशीर्वाद घेतल्यास कोणत्याही देवाची पूजा करावी लागत नाही. आपल्याला अन्नाला लावणाऱया जीवनाला योग्य दिशा दाखविणाऱया व्यक्तींना गुरुस्थानी मानून त्यांच्याविषयी कृतज्ञभाव व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. ज्यांच्या मार्गदर्शन व मदतीमुळे आपण चार घास खातो, त्या सर्वांनाच गुरुस्थानी मानले पाहिजे. आपली सुखदुखे बाजूला ठेवून संसाराचा गाडा ओढणारे आई-वडील, पती-पत्नी, बहीण, मावशी, आत्या व सासू-सासरे, दीर, नणंदा भावजया, तसेच कुटुंबाचा चरितार्थ चालावा, यासाठी कोणतीही तक्रार  न करता राबणारा कर्ता पुरुष, संकटकाळी नातेवाईकापेक्षाही लवकर येऊन मदत करणारे शेजारी, नोकरी देणारे मालक, कामाचा गाडा ओढणारे कर्मचारी, आपल्या घराचे रक्षण करणारे मुके  प्राणी, शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक आपल्याला सुखरुप घेऊन जाणारे वाहन या साऱयांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. गरीब मुला-मुलींना शिक्षण घेता यावे, यासाठी काही दानशूर व्यक्ती देणग्या वगैरे देतात. त्यांचा हेतू कितीही चांगला असला तरी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याचे काही सोयरसुतक नसते. दारु प्यायला, मौजमजा व इतर सर्व तऱहेच्या चैनी करण्यासाठी यांच्याकडे पैसा असतो, पण मुलांच्या शिक्षणासाठी लागणारी पुस्तके फी वगैरेसाठी यांच्याकडे पैसा नसतो. लोक देणग्या वगैरे देतात. सरकार माध्यान्ह आहार पुस्तके व सायकली गणवेश वगैरे देते. गरिबांना मोफत शिक्षण देते. मग आपण कशाला चिंता करायची? मुले आपोआप शिकतील अशी यांची धारणा असते, असे लोक कृतज्ञ नसतात. सरकारने  इतकी मदत करूनही विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून नाव काढले,असे कधी होत नाही. म्हणून सरकारने जातीयता व इतर प्रकारे फुकटच्या सवलती देणेबंद केले पाहिजे, अशा सवलतीने माणसे आळशी व व्यसनाधिन  बनतील. मुले ऐकत नाहीत, उद्धटपणाने वागतात. चारचौघात अपमान करतात. क्रिकेटसारख्या टाईमपास हजारो तास कामाचा खोळंबा करणाऱया खेळामागे लागून शिक्षण मध्येच सोडतात. अशा तक्रारी सतत ऐकू येत असतात.

पूर्वार्ध

मेष

 नोकरी, व्यवसाय, देणीघेणी व जागेचे व्यवहार पूर्ण होतील. पण कागदपत्रे योग्य प्रकारे तपासून घ्यावेत. महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. संस्था अथवा तत्सम निवडणुकीत यश मिळवाल. धाडशी निर्णय घेऊन ते अमलात आणाल. सध्या राशीस्वामी मंगळ बलहीन आहे. नको ती संकटे येतात. सावध राहूनच कामे करावी लागतील. नोकरी वगैरे सांभाळून ठेवणे आवश्यक.


वृषभ

कुणाची तरी भांडणे  सोडवायला जाऊन नको त्या संकटात पडाल. त्यासाठी काळजी घ्यावी. धोकादायक व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करा. सरकारी अधिकाऱयांशी जपून  राहणे आवश्यक. गडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. धनलाभाची शक्मयता. अडलेली कामे होतील. विवाह व नोकरी व्यवसायात चांगले यश.


मिथुन

तुमच्या राशीतील राहू व इतर ग्रहांचे असहकार यामुळे काही गोष्टी मानविरुद्ध घडण्याची शक्मयता आहे. हा योग चांगला नसतो. किरकोळ अपघातदर्शक आहे. त्यासाठी सर्वक्षेत्रात जपून रहा. अचानक संकटे येऊ शकतात. भाग्योदय भरभराटीच्या दृष्टीने चांगले योग. अनेक इच्छा पूर्ण होतील. नोकरी व्यवसायाला कलाटणी देणाऱया शुभ घटना.


कर्क

नोकरीत स्थलांतर व बढतीचे योग. संशयी वातावरण निर्माण करणारे योग. त्यामुळे वैवाहिक सौख्यास ग्रहण लागण्याची शक्मयता. मतभेद, वादावादी, गैरसमज यांना थारा देऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या बाबतीत काही समस्या निर्माण होतील, पण आर्थिक स्थिती उत्तम राहील. दूरवरचे प्रवास योग टाळता आल्यास चांगले. कुठेही बोलताना शब्दात अडकू नका. भागीदारी व्यवसाय असेल तर गुप्त कुरबुरी बाहेर येतील.


सिंह

अशुभ स्थानी मंगळ, केतुचा योग होत आहे. आरोग्याची काळजी घ्या. काही जणांच्या कारवायामुळे स्थलांतराला सामोरे जावे लागेल. धोकादायक राजकारणात गुंतू नका. आर्थिक बाबतीत  मोठे यश लाभेल. समाजकारण व राजकारण यात उत्साहाने भाग घ्याल. मध्यस्थी व भाग्योदयाची कोणतीही संधी सोडू नका. काही अपरीपक्व कर्मचाऱयांच्या साहाय्याने अवघड कामात सहज यश मिळवाल.


कन्या

 राहू बरोबर असलेले ग्रह शापीत योग निर्माण करतात. त्यामुळे अपेक्षित काम होईलच, या भ्रमात राहू नका. कुणावरही विसंबून न रहाता स्वत: जे काम कराल ते यशस्वी होईल. विवाह, धनलाभ, भागीदारी, व्यवसाय व कोर्टप्रकरणे या बाबतीत सावध रहाणे आवश्यक. नको त्या योजनेत गुंतवणूक करू नका.


तुळ

 आर्थिक बाबतीत लाभदायक योग. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यास हरकत नाही पण बारीकसारीक तपशीलाकडे दुर्लक्ष करू नका. मूळ कुंडलीतील योग चांगले असतील तर जीवनाचे सोने होईल. वैवाहिक बाबतीत कोणतेही धाडशी निर्णय घेऊ नका. महत्त्वाचे निर्णय घेताना दहावेळा विचार करा. विशेषत: प्रेमप्रकरणे असतील तर जरा काळजी घ्यावी.


वृश्चिक

असलेल्या कामात नवीन काहीही भर घालू नका. कोणत्याही बाबतीत अती करू नका. मोठमोठी कर्जे, मतभेद, वादविवाद, मिटविण्याच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्या. पण निष्कारण महागडे उपचार घेऊ नका. फसवणूक होईल. ज्या क्षेत्रात असाल यात नावलौकिक धनलाभ व मानमान्यता मिळेल.


धनु

तुमच्या हातून कुणाचे भले झालेले असेल, घराण्यातील पूर्वज शांत असतील तर ते कुणाच्या रुपाने तुमचा भाग्योदय करतील सांगता येणार नाही. या आठवडय़ात याचा अनुभव येईल. हौसेने एखादे केलेले काम मोठे लाभदायक ठरेल. संततीप्राप्तीचे चांगले योग. नोकरीविषयक वाटाघाटीत उत्तम यश मिळेल, पण व्यवहारी वृत्ती ठेवूनच वागा.


मकर

ग्रहमान विचित्र असल्याने घाईगडबडीत किमती वस्तू खरेदी करू नका. गुरु कृपा असल्याने आर्थिक लाभ चांगले होत राहतील. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. पुढे त्रास होऊ शकतो. मंत्र- तंत्र व करणीबाधा अशा अघोरी प्रकारापासून जपावे लागेल. तुमच्या खासगी बाबींचा कुणीतरी गैरवापरही करू शकतात, काळजी घ्या. आर्थिक समस्या मिटतील.


कुंभ

वास्तुविषयक समस्या असतील तर त्या मिटविण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्चही कमी होतील. अत्यंत महत्त्वाच्या बाबींना प्राधान्य द्या, म्हणजे कामे अडणार नाहीत. अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. मतभेद मिटविण्यास उत्तम. वास्तू, घर, जागा, दुकान, वाहन वगैरे बाबतीत अनुकूल योग दिसतात.


मीन

कमी पैशात दुप्पट लाभ या प्रकारच्या भुलभुलैयापासून दूर रहा. कुठेतरी केलेल्या गुंतवणुकीत  फसवणूक होईल. अथवा जादा रक्कम देऊन बसाल. कर्जफेडीसाठी प्रयत्न करा. योग्य मार्ग मिळेल. मन शांत ठेवून परिस्थिती हाताळा म्हणजे मोठी कामे होतील. नवे स्नेहसंबंध, आर्थिक सुधारणा, प्रवासासाठी अनुकूल आहे.