|Sunday, February 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » एआय यंत्रणेची भारतातही चाचणी

एआय यंत्रणेची भारतातही चाचणी 

चेहरा पाहून गुन्हेगार ओळखणार यंत्रणा : ब्रिटनमध्येही चाचणी

नवी दिल्ली

 गुन्हा करून सहजपणे वाचणे आता गुन्हेगारांसाठी आता सोपे ठरणार नाही. लंडनच्या स्टार्टअप फेससॉफ्ठने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सनेयुक्त एक  यंत्रणा तयार केली असून त्याच्या मदतीने कुणाच्याही चेहऱयावरील हावभाव पाहून त्याचा खोटारडेपणा ओळखला जाऊ शकतो. या यंत्रणेची लवकरच भारत आणि ब्रिटनमध्ये चाचणी केली जाणार आहे. एआय यंत्रणा तयार करण्यासाठी 30 कोटींहून अधिक चेहऱयांच्या भावमुद्रा संग्रहित करण्यात आल्या आहेत.

समोरील व्यक्तीच्या मेंदूत नेमकं काय चाललंय याची अचूक माहिती प्राप्त होईल अशाप्रकारे एआय यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे. याची माहिती मायक्रो एक्स्प्रेशनच्या माध्यमातून प्राप्त होते. मनोवैज्ञानिकांनी या पद्धतीचा अवलंब सर्वप्रथम 1960 मध्ये केला होता. या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगाराबद्दल माहिती तर मिळणार आहे, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येसारखे नकारात्मक विचार निर्माण होत असल्यास तेही समजणार आहे. जर एखादा माणूस बळजबरीने हसत असल्यास त्याचे भाव डोळय़ात दिसून येत नाहीत, हे एकप्रकारे मायक्रो एक्स्प्रेशन असल्याचे फेससॉफ्टचे संस्थापक डॉ. पोनिआह यांनी म्हटले आहे.

एआय यंत्रणेची कार्यपद्धत

इम्पीरियल कॉलेज लंडनचे कृत्रिम बुद्धिमता तज्ञ स्टेफिनोजनुसार कुठलाही गुन्हा करणाऱया गुन्हेगाराची चौकशी केली जात असताना तो स्वतःच्या चेहऱयावरील भावमुद्रा बदलत राहतो. अशा स्थितीत त्याचे ओठ, डोळे आणि चेहऱयाचे भाव एकसारखे नसतात, कारण ते बनावटी असतात. अशा स्थितीत गुन्हेगाराच्या सर्व अस्वाभाविक भावमुद्रांची नोंद होईल आणि मनोवैज्ञानिक त्यांचे विश्लेषण करतील.

30 कोटींपेक्षा अधिक मानवी भाव

एआय यंत्रणेत 30 कोटींपेक्षा अधिक मानवी चेहऱयाच्या भावमुद्रा संग्रहित करण्यात आल्या आहेत. यात प्रत्येक वयोगट, वर्ग आणि स्त्राr-पुरुषांच्या छायाचित्रांना सामील करण्यात आले आहे. त्यांचा आनंद, भीती आणि आश्चर्य यासारख्या भावमुद्रांचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न झाला आहे. चेहऱयावरील कुठलाही भाव बदलत असल्यास एआय यंत्रणा तो बदल त्वरित टिपणार आहे.

Related posts: