|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहन चालकांवर कारवाई

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहन चालकांवर कारवाई 

बेळगाव/ प्रतिनिधी

मंगळवारी दिवसभरात वाहतुक नियम मोडणाऱया 126 वाहन चालकांवर पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. आणि त्यांच्याकडून एकूण 49 हजार 200 रूपये दंड आकारण्यात आला आहे. पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

गेल्या आठवडय़ाभरापासुन रहदारी पोलीसांकडून वाहतुक नियम मोडणाऱया वाहन चालकांविरूद्ध कारवाई सत्र सुरू आहे. मंगळवारीही पोलीसांनी दिवसभरात वाहतुक नियम मोडणाऱया 126 वाहन चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून 23 हजार 100 रूपये दंड आकारण्यात आला आहे. तर रहदारी नियमांचे उल्लंघन केलेल्या 15 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून 1500 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबरोबरच वाहतुक नियम मोडणाऱयांविरूद्ध कारवाई करून 24 हजार 600 रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय 11 वाहन चालक – मालकांचा वाहन परवाना – नोंदणी रद्द करण्यासाठी आरटीओकडे पाठविण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात वाहतूक नियम मोडणाऱयांविरूद्ध कारवाई करून एकूण 49 हजार 200 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.