|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रिक्षामध्ये सहा विद्यार्थीच अनिवार्य

रिक्षामध्ये सहा विद्यार्थीच अनिवार्य 

प्रतिनिधी/ बेळगाव

रिक्षामध्ये 10 ते 15 विद्यार्थी कोंबून नेले जातात. बऱयाचवेळा लहान -मोठय़ा अपघातांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. रिक्षामध्ये केवळ सहाच विद्यार्थ्यांना घेण्याचा आदेश न्यायालयाने देखील दिला आहे. त्यामुळे सहाच विद्यार्थी रिक्षामध्ये घालावेत. पालक तुम्हाला योग्य तो दर देतील, असे रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱयांना जिल्हाधिकाऱयांनी सांगितले आहे. मात्र किमान 7 ते 8 तरी विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी, असा आग्रह रिक्षाचालकांनी धरला होता. या प्रकारामुळे पुन्हा हे घोंगडे भिजतच पडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.

वर्दीच्या रिक्षा चालकांचा संप गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचेही हाल होत आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरटीओ कोणताच निर्णय घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. दिवसेंदिवस गैरसोय वाढतच चालली होती. मंगळवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेवून रिक्षा संघटनांनी चर्चा केली. मात्र जिल्हाधिकाऱयांनी केवळ सहाच विद्यार्थी ने-आण करण्यासाठी परवानगी दिली जाईल. अधिक विद्यार्थी कोंबणाऱया रिक्षा चालकांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर रिक्षा चालकांनी पालकमंत्र्यांना विनंती केली. त्यांनी आरटीओ तसेच पोलिसांनी संयुक्तपणे बैठक घेवून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना केली आहे. एकूणच अजूनही गुंता काही सुटला नसल्याचेच पुन्हा एकदा दिसून आले. यामुळे रिक्षा चालक रात्री उशीरापर्यंत बैठक घेऊन चर्चा करत होते. त्यामुळे रिक्षा चालक नेमकी भूमिका काय घेणार हे आता लवकरच समजणार आहे.

Related posts: