|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेश महामंडळ, मूर्तीकार आणि विपेत्यांची बैठक घेवून निर्णय

गणेश महामंडळ, मूर्तीकार आणि विपेत्यांची बैठक घेवून निर्णय 

प्रतिनिधी/ बेळगाव

आम्ही नदी, विहिरी किंवा नाल्यामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करत नाही. त्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न उद्भवत नाही. तेंव्हा पिओपीवर घालण्यात येणारी बंदी चुकीची आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काढलेला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली. मात्र यावेळी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी काहीही झाले तरी प्रदुषण हे होतेच. तेंव्हा पिओपीला आम्ही परवानगी देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर साऱयांनी यावषी आम्हाला मुभा द्या अशी विनंती केली. त्यावर पालकमंत्र्यांनी मूर्तीकार, महामंडळ आणि विपेत्यांची बैठक घेऊन चर्चा करण्याची सूचना केली आहे.

गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरीसच्या राहिल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला होता. याबाबत गेल्या काही दिवसांपासून जनजागृतीही सुरु असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने बैठका घेवून सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे गणेशमूर्तीकार अडचणीत आले आहेत. महत्वाचे म्हणजे सार्वजनिक मूर्तींबाबत मोठी समस्या निर्माण होणार आहे. गणेशोत्सव केवळ दोन महिन्यांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे हा निर्णय घाईगडबडीचा होणार आहे. यावर्षी आम्हाला मुभा द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने केली.

माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी आम्ही गणेशमूर्ती या महापालिकेने तयार करण्यात आलेल्या तलावामध्ये विसर्जन करत असतो. त्यामुळे प्रदुषण होत नसते. तेंव्हा अशी बंदी घालणे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी दरवषी तुम्ही मुभा देण्याची मागणी करता. त्यानंतर पुढील वषीही पुन्हा पिओपीच्या मूर्ती तयार करता. दरवषीच असा प्रकार सुरु आहे. त्यामुळे यावषी आम्ही कठोर भूमिका घेणार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आम्हाला ही कारवाई करावी लागत आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

गणेशमूर्तीकारांनी शक्मयतो शाडूच्या मूर्ती बनवाव्यात. याचबरोबर नैसर्गिक रंगाचाही वापर करावा. कारण भविष्यासाठी प्रत्येकानेच काळजी घेणे गरजेचे आहे. अलिकडे केमिकल मिश्रीत रंग मोठय़ा प्रमाणात वापरण्यात येत आहे. त्यामुळे पाणी दुषित होत आहे. कुंडात किंवा इतर ठिकाणी मूर्ती विसर्जन केल्यानंतर पाण्याचा उपसा केला जातो. ते पाणी इतरत्र ठिकाणी मिश्रीत होत आहे. याचबरोबर पिओपीमुळे पायांना जखम होत आहे. बऱयाचवेळा विसर्जन केलेली मूर्ती काढताना जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अधिकाधिक शाडूच्याच मूर्ती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रत्येकाने काळजी घ्या. आता शेवटचे दिवस आहेत. हे खरे आहे. पण दरवषीच अशा प्रकारे मागणी करणे योग्य नाही. तरी देखील आता तातडीने गणेशमूर्तीकार, मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि विपेत्यांची बैठक घेवून चर्चा करा आणि निर्णय घ्या, असे सांगितले. यावेळी  मदन बामणे, गणेश दड्डीकर, राजू सुतार, रमेश सोनटक्की, अशोक चिंडक, राजकुमार बोकडे, अर्जुन देमट्टी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.