|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठी शिक्षकांसाठी ‘नो व्हेकेन्सी’

मराठी शिक्षकांसाठी ‘नो व्हेकेन्सी’ 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर आणि खानापूर तालुक्मयात मराठी शिक्षकांच्या जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. मात्र मंगळवारी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात झालेल्या ऑनलाईन कौंन्सिलींग प्रक्रिये दरम्यान बेळगाव शहर व खानापूर तालुक्मयासाठी ‘नो व्हॅकेन्सी’ आल्याने मराठी शिक्षकांवर अन्याय झाला आहे. मंगळवारी झालेल्या कौन्सिलींग प्रक्रियेत रामदुर्ग भागासाठी शिक्षकांची भरती झाली.

खानापूर तालुक्मयात सुमारे 160 हून अधिक मराठी शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तर बेळगाव शहरातही 10 ते 15 जागा रिक्त आहेत. यामुळे याठिकाणी शिक्षकांची नेमणूक होणे गरजेचे आहे. मात्र मंगळवारी झालेल्या ऑनलाईन कौन्सिलींग प्रक्रियेत बेळगाव व खानापूर तालुक्मयासाठी नो क्हेकेन्सी आल्याने याठिकाणी प्रक्रिया चालली नाही. रामदुर्गसह बैलहोंगल, बेळगाव शहर आणि खानापूर तालुक्मयात शिक्षकांच्या असंख्य जागा रिक्त आहेत. मात्र कौन्सिलींग प्रक्रियेत केवळ रामदुर्ग भागात नेमणूक केली. 

 

Related posts: