|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » मध्य रेल्वेकडून अखेर रविवारचे वेळापत्रक मागे, लोकल वाहतूक नियमितपणे सुरू

मध्य रेल्वेकडून अखेर रविवारचे वेळापत्रक मागे, लोकल वाहतूक नियमितपणे सुरू 

 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

मुसळधर पावसाची शक्मयता गृहित धरून बुधवारी लोकलसेवेसाठी लागू केलेले रविवार वेळापत्रक मध्य रेल्वेने अखेर मागे घेतले आहे. त्यामुळे आता लोकलवाहतूक नियमितवेळापत्रकाप्रमाणे सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे वाहतुकीवर झालेला परिणाम विचारात घेऊन मध्य रेल्वेने बुधवारी रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकलसेवा चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यामुळे धवणाऱया लोकलचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याने सर्व स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. तसेच बराचवेळ थांबूनही लोकल येत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता.

सलग चार दिवस पावसाचा जोर कायम राहिल्याने, उपनगरी रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. मंगळवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचले होते. त्यामुळेच रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल धावत असल्याने अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. स्थानकांवर लोकल येतानाच खचाखच भरुन येत असल्या कारणाने स्थानकावर उभ्या प्रवाशांना चढता येत नव्हतं. या गर्दीचा फटका अनेक प्रवाशांना बसला. ठाण्यात चेंगराचेंगरीज दोन महिला बेशुद्द पडल्या.

बुधवारी मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला होता. विशेष म्हणजे ऑफिसची वेळ निघून गेल्यानंतर मध्य रेल्वेला जाग आली आहे.

 

Related posts: