|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » न्यायव्यवस्थेत घराणेशाही, जातीयवाद : न्या.रंगनाथ पांडेय

न्यायव्यवस्थेत घराणेशाही, जातीयवाद : न्या.रंगनाथ पांडेय 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची निवड करताना घराणेशाही आणि जातीवाद केला जातो, असा आरोप इलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश रंगनाथ पांडेय यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे.

मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्याने पांडेय यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भाजपच्या विजयानंतर भारताच्या राजकीय पटलावर असणारी घराणेशाही नष्ट होत चालली आहे. 34 वर्षाच्या न्यायाधीश म्हणून केलेल्या कारकीर्दीत न्याय व्यवस्थेतील ज्या त्रुटी अनुभवल्या त्या पांडेय यांनी त्यांच्या पत्रातून मोदींपर्यंत पोहचविल्या आहेत.

दुर्दैवाने सध्या न्यायव्यवस्थेत जातीवाद आणि घराणेशाही मोठय़ा प्रमाणात फोफावली आहे. न्यायाधीश होण्यासाठी कोणत्याही पात्रतेची गरज नसून, न्यायाधीश कुटुंबातील सदस्य अथवा जात पाहून न्यायाधीश बनविले जाते असा आरोप पत्रात केला आहे. राजकीय कार्यकर्त्याला त्याची योग्यता सिद्ध करण्यासाठी निवडणुकीत उभे राहून जनतेचा कौल घ्यावा लागतो. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेत उतरावे लागते. मात्र, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी कोणताही मापदंड नाही. न्यायव्यवस्थेतील या त्रुटी दूर करुन न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पांडेय यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

Related posts: