|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » अंबाती रायडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

अंबाती रायडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती 

 

ऑनलाइन टीम  / मुंबई : 

भारतीय संघाचा मधल्या फळीतला फलंदाज अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषकांमध्ये रायडू राखीव खेळाडूंमध्ये होता. मात्र, विजय शंकर आणि शिखर धवन दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही निवड न झाल्यामुळे रायडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. रायडू ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी रायडू आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. रायडूने 2004 मध्ये अंडर- 19 च्या भारतीय संघाचे कर्णधरपद भूषावले आहे.

33 वषीय रायुडूनं 55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही.

Related posts: