|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » अभिनेता आदित्य पंचोलीला अंतरिम जामीन

अभिनेता आदित्य पंचोलीला अंतरिम जामीन 

 

ऑनलाइन टीम  /मुंबई : 

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अभिनेता आदित्य पंचोलीविरोधत बलात्कार प्रकरणी एफआयआर दाखल केले होते. आता या प्रकरणी आदित्य पंचोलीला दिलासा मिळाला आहे. पंचोलीला दिंडोशी सेशन कोर्टाकडून 19 जुलैपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला आहे.

मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये स्टेटमेंट दाखल करण्यात आले होते. हे स्टेटमेंट रेकॉर्डेड होते. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. या केसमध्ये पुरावे गोळा करणे, कठीण होत आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण, हे प्रकरण 10 वर्षांपूर्वीचे आहे.

अभिनेत्री कंगना राणावतची बहिण रंगोली चंदेलनेदेखील पंचोलीवर आरोप केला होते. रंगोलीने सांगितले होते की, पंचोलीविरोधत 2007 मध्ये शारीरिक शोषण, त्रास देणे, जबरदस्तीने वसूलीची तक्रार केली होती.

Related posts: