|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » फडणवीस यांच्या आमदारकीबाबत 23 जुलैला सुनावणी

फडणवीस यांच्या आमदारकीबाबत 23 जुलैला सुनावणी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 23 जुलै रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी आरोप अ‍Ÿड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली आहे.

फडणवीस यांच्यावर नागपुरात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा गुन्हा फसवणुकीचा आहे. 2014 मध्ये फडणवीस यांनी विधानसभा निवडणुक लढविली. या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुह्यांची माहिती त्यांनी लपविली आहे. दोन्ही गुन्हे लपवून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावाही याचिकाकर्ते उके यांनी केला आहे. फडणवीस यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.

Related posts: