|Saturday, October 19, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » सुप्रीम कोर्टाचे निकालपत्र आता प्रादेशिक भाषांमध्येही

सुप्रीम कोर्टाचे निकालपत्र आता प्रादेशिक भाषांमध्येही 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सुप्रीम कोर्टातील खटल्यांचे निकालपत्र आता अन्य प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर इंग्रजी भाषेतच निकालपत्र अपलोड करण्यात येत होते. मात्र, आता ते मराठी, हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तुलुगू भाषेतही अपलोड करण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुरुवातीला 500 पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षित स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या जुलै महिना अखेरीस अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल वेबसाइटवर अपलोड होतील.