|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » जीएसटीमुळे गुजरातचे वर्षाला 4-5 हजार कोटींचे नुकसान : नितीन पटेल

जीएसटीमुळे गुजरातचे वर्षाला 4-5 हजार कोटींचे नुकसान : नितीन पटेल 

 

ऑनलाइन टीम /अहमदाबाद :

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी जीएसटी करामुळे गुजरातचे वर्षाला 4-5 हजार कोटींचे नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. नितीन पटेल यांनी गुजरातचे नुकसान झाल्याचे सांगितले असले तरी भविष्यात या कराचा फायदा होईल असे म्हटले आहे.

कार्यक्षम आणि पारदर्शक करप्रणालीसाठी केंद्र सरकारने उचललेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. पटेल यांनी या जीएसटी लागू करण्याचे सगळे श्रेय पंतप्रधन नरेंद्र मोदी यांना दिले आहे. त्यांनी टीका सहन करून यासाठी पुढाकार घेतला. मोदी जर कोणता कायदा बनवित असतील तर बनवत असताना गुजरातचे हित लक्षात घेऊन बनविला जाईल, असा दावाही पटेल यांनी केला आहे.

Related posts: