|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स-निफ्टीत तेजीची हलकी झुळूक

सेन्सेक्स-निफ्टीत तेजीची हलकी झुळूक 

सेन्सेक्स 22.77 अंकानी वधारला : निफ्टी 11,916.75 वर बंद

वृत्तसंस्था/ मुंबई

मुंबई शेअर बाजारात बुधवारी तेजीची हलकी झुळूक नोंदवत बाजार बंद झाला.  तर शुक्रवारी सादर होणाऱया केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पावित्रा घेतल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 22.77 अंकानी वधारत 39,839.25 वर स्थिरावाला आहे. तर दुसऱया बाजूला एनएसई निफ्टी 6.45 अंकानी तेजी नोंदवत 11,916.75 वर बंद झाल्याची नोंद करण्यात आली.

अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी सावध पावित्रा गुंतवणूकदार घेत असल्याचे दिसून येत आहे. कारण 2019-20 मध्ये सादर होणारा अर्थसंकल्प नवीन कोणत्या तरतूदी करणार आहे. रोजगार, कृषी व उद्योग क्षेत्रांसाठी नवीन काय बदल होणार का यासह अन्य बाबीची व्यापार क्षेत्रांसह अन्य गुंतवणूकादारांमध्ये दबावाच वातावरणाचे संकेत राहणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक आयटीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा पॉवर ग्रिड एशियन, पेन्टस, स्टेट बँक यांचे समभाग अंतिम क्षणी 3.79 तेजीत राहिल्याची नोंद करण्यात आली. तर दुसऱया बाजूला  टेक महिंद्रा, वेदान्ता, इन्फोसिस, येस बँक, टाटा मोटर्स, टीसीएस, एचसीएल टेक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग मात्र ड1.44 टक्क्यांनी घसरल्याची नोंद करण्यात आली.

महत्वाच्या क्षेत्रांची कामगिरी

बीएसई सेन्सेक्समध्ये रियल्टी , कॅपिटल गुड्स, पॉवर, एफएमसीजी, इंडस्ट्रीयल्स, ऊर्जा आणि फायनान्स यांचे निर्देशांक 0.76 टक्क्यांनी वधारल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आयटी, टेक कझ्युमर डय़ुरेबल्स, हेल्थ केअर, ऑटो आणि युटिलीटी यांचे निर्देशांक मात्र 0.86 टक्क्यांनी खाली आलेत.

परंतु आज मुंबई शेअर बाजारामध्ये मात्र दबावात व्यवहार होण्याचे संकेत शेअर बाजारातील तज्ञांकडून यावेळी व्यक्त केले आहेत.

Related posts: