|Friday, December 6, 2019
You are here: Home » leadingnews » आरएसएसविरोधी ट्विट : राहुल गांधी यांना जामीन मंजूर

आरएसएसविरोधी ट्विट : राहुल गांधी यांना जामीन मंजूर 

 

ऑनलाइन टीम / मुंबई :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामाजिक कार्यकर्ते गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध जोडल्याप्रकरणी मुंबईतील शिवडी कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्मयावर कोर्टाने राहुल गांधी यांना हा जामीन दिला. याप्रकरणी राहुल गांधी मुंबईतल्या शिवडी कोर्टात हजर झाले. त्यावेळी राहुल गांधी यांनी मी दोषी नाही असे वक्तव्य केले.

निवडणकीदरम्यान आरएसएसविरोधी ट्विट केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सुनावणीसाठी शिवडी कोर्टात पोहोचले आहेत. राहुल गांधी यांच्यावरील आरोप कोर्टात सिद्ध झाल्यास त्यांना जामीनासाठी अर्ज करावा लागणार आहे. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड आणि नसीन खान हे राहुल गांधी यांच्यासाठी जामीनपत्र देणार आहेत. राहुल गांधी यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध आरएसएसशी जोडणारे ट्विट केले होते.

राहुल गांधी शिवडी कोर्टात दाखल होत असताना काँग्रेसच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी शिवडी कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली आहे. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या व्यतिरिक्त राहुल यांना आणखी 4 प्रकरणांसाठी देशातील वेगवेगळय़ा कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

Related posts: