|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दर्शनरांगेतील भाविकांच्या ‘पाउलांचीही’ काळजी

दर्शनरांगेतील भाविकांच्या ‘पाउलांचीही’ काळजी 

पंढरपूर / प्रतिनिधी :

   सतरा दिवसाचा प्रवास करून चालत येणा-या विठुभक्तांची दर्शनरांगेतील ‘वाट’ यंदा अधिक सुखकर होणार आहे. यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेत ग्रीनकार्पेटसह पहील्यादाच मुलायम असे रबरी मॅट देखिल अंथरण्यात येणार आहे. त्यामुळे पदस्पर्श दर्शनरांगेत 16 तासांहून अधिककाळ उभारणा-या भाविकांच्या ‘पाउलांची’ काळजीच एकप्रकारे घेतली जाणार आहे.

उन , वारा , पाउस यांची कुठलीही तमा न बाळगता. लाखों वारकरी हे सावळया विठठलांच्या दर्शनाची आस घेउन पंढरपूरला येतात. आणि याठिकाणी पदस्पर्श दर्शन मिळावे. यासाठी सुमारे 16 तासांहून अधिकचा काळ दर्शनरांगेत व्यतीत करतात. विठोबाची दर्शनरांग ही मंदिरापासून सुमारे 5 किमी दूर आहे. रस्तयावरून जाणा-या दर्शन रागेमधे कायमच भाविकांना वेगवेगळया सुविधा पुरविण्यात येतात. यामधेच गतवर्षी भाविकांच्या पायांना त्रास होउ नये. यासाठी ग्रीन कार्पेट टाकण्यात आलेले होते.

  यंदाच्या वर्षी देखिल मंदिर समितीने ग्रीन कार्पेट टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सदरच्या ग्रीन कार्पेटच्या खाली पाउसांचे पाणी तसेच कचरा , खडी अडकून पडू नये. आणि ग्रीन कार्पेट देखिल मउ , मुलयम अशा पध्दतीचे रहावे. यासाठी आगामी वारीत दर्शनरांगेत रबरी मॅट टाकले जाणार आहेत. या मॅटच्या वर ग्रीन कार्पेट अंथरले जाईल. जेणेकरून मॅटवर उभारल्यावर पंढरीची वाट चालत येणा-या भाविकांची पाउले मंदिराकउs जाताना अधिक सुखदायी पध्दतीने मार्गेस्थ होतील.

    ग्रीन कार्पेटखाली रबरी मॅट टाकण्यासंबधीच्या सुचना नुकत्याच जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी मंदिर समितीस दिल्या. त्यानुसार मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे. पुढील काही दिवसात  संपूर्ण दर्शनरांगेमधे ग्रीन कार्पेटच्या खाली रबरी मॅट टाकून भाविकांच्या ‘पाउलांचीही’ काळजी प्रशासकडून घेतली जाणार आहे.

कार्पेटचा ‘भोसले पॅटर्न’

   गतवर्षी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांनी भाविकांचे स्वागत ग्रीन कार्पेटवरून करण्यांचे निश्चित केले. आणि त्यांची अंमलबजावणी केली. यंदा  जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी ग्रीन कार्पेटच्या खाली रबरी मॅटसदृष्य कार्पेट  टाकून भाविकांच्या पाउलांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निश्चितच दर्शनरांगेतील कार्पेटचा ‘भोसले पॅटर्न ’ हा नव्याने तयार झाला आहे. 

Related posts: