|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Automobiles » टाटाच्या ‘बझार्ड’ एसयुव्हीचे लवकरच लाँचिंग

टाटाच्या ‘बझार्ड’ एसयुव्हीचे लवकरच लाँचिंग 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपल्या ‘हेक्सा’ या कार नंतर आणखी एक या सात आसनी कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

भारतात बीएस 6 नियमावली लागू होण्यापूर्वी टाटा हेक्सा बंद करणार आहे. हेक्सा कारचे उत्पादन थांबवून ‘बझार्ड’ ही सात आसनी एसयुव्ही टाटा लाँच करणार आहे. टाटाने नुकतीच पाच सीटर हॅरिअर लाँच केली आहे. या कारला चांगली मागणी आहे. अल्पावधीतच या कारने ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नव्याने लाँच करण्यात येणारी ‘बझार्ड’ एसयुव्ही ही टाटा हॅरिअरचे 7 सीटर व्हर्जन आहे. ही कार जिनिव्हाच्या मोटर शो मध्ये दाखविण्यात आली होती. ही कार वर्षाअखेरीस किंवा 2020 च्या सुरूवातीला लाँच केली जाणार आहे.

लँड रोव्हरच्या डी8 प्लॅटफॉर्मवर ही कार विकसित करण्यात आली आहे. याच प्लॅटफॉर्मवर डिस्कव्हरी स्पोर्ट एसयुव्ही आहे. बझार्ड एसयुव्हीमध्ये हॅरिअरचेच 2.0 लीटर क्रायोजेनिक इंजिन देण्यात आले आहे. जे हॅरिअरपेक्षा ताकदवान असणार आहे. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ह्युंदाईकडून घेतलेला 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऍटोमॅटीक गिअरबॉक्स मिळणार आहे.

Related posts: