|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » राजीव गांधी हत्याप्रकरणातील नलिनीला 30 दिवसांचा पॅरोल

राजीव गांधी हत्याप्रकरणातील नलिनीला 30 दिवसांचा पॅरोल 

मुलीच्या लग्नाकरता मागितली आहे रजा

वृत्तसंस्था/ चेन्नई

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारी आरोपी नलिनी श्रीहरन हिला 30 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नलिनीचा पॅरोल अर्ज मान्य केला आहे.

एप्रिल महिन्यामध्ये मद्रास उच्च न्यायालयाने नलिनीने दाखल केलेल्या एका याचिकेवरुन तमीळनाडू सरकारला नोटीस बजावली होती. पॅरोल अर्जाकरता नलिनीला स्वतंत्र व वैयक्तिक स्वरुपामध्ये याचिका दाखल करण्यास मान्यता देण्याविषयी सांगितले होते. त्यानुसार नलिनी हिने पॅरोल अर्ज दाखल केल्यानंतर हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. नलिनीला राजीव गांधी हत्याकांडामध्ये दोषी मानून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तथापि नंतर जन्मठेपेमध्ये ही शिक्षा परावर्तीत करण्यात आली आहे. तिच्याशिवाय अन्य सहा आरोपीही जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

Related posts: