|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मी भाजपमधून निवडणूक लढवण्यास तयार-

मी भाजपमधून निवडणूक लढवण्यास तयार- 

प्रतिनिधी/तासगाव

तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून  अधिकृत उमेदवारी मिळाल्यास आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे.मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट मत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी तासगांव येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.तर याची मुहर्तमेढ म्हणून रविवारी तासगांव येथे कार्यकर्ता मेळावा व खासदार,मंत्रीमहोदय,व आमदर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

     यावेळी बोलताना अजितराव घोरपडे म्हणाले,जिल्हयात सर्वत्र भाजपचे वातावरण आहे.अधिकचे आमदार ही भाजपचे आहेत.मात्र तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात भाजपचा आमदार नाही.याच पार्श्वभूमीवर काही गोष्टी करावयाच्या आहेत.आणि या गोष्टी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन केल्या जाणार आहेत.यासाठी रविवार दि.7 जुलै रोजी दुपारी 1 वाजता तासगांवातील समृध्दी मल्टीपर्पज हॉल येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे.

     याचवेळी सलग दुसऱयांदा खासदार म्हणून निवडून आलेले खासदार संजयकाका पाटील,मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांची नुकतीच राज्याच्या मंत्रीमंडळात सामाजिक न्याय मंत्री म्हणून निवड झाल्याने त्यांचा,तसेच नव्याने आमदार म्हणून निवड झालेले पृथ्वीराजबाबा देशमुख यांच्या सत्काराचे आयोजन ही करण्यात आले आहे.या तिन्ही सत्कारमुर्तीसह जिल्हयातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत असे ही अजितराव घोरपडे यांनी सांगितले.

     विधानसभा निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून भाजपचे खासदार,मंत्रीमहोदय यांच्यासह भाजप पक्षाकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत या विषयी या मेळाव्यात चर्चा होणार असून विधासभा निवडणूकीची मुर्हतमेढ म्हणून हा मेळावा आहे.असे ही त्यांनी सांगितले.

      तासगांव-कवठेमहांकाळ हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे अशी विचारणा केली असता,अजितराव घोरपडे म्हणाले,ही या मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली आहे.मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत.तर या निवडणूकीत आपण भाजपमधून उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत आणि तसे आपण भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱयांना सांगितले आहे.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत याबाबत चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यानी दिलेल्या शब्दामुळे आपणास भाजपची उमेदवारी असा आशावाद आहे.असे ही त्यांनी स्पष्ट केले.

      मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे अशी विचारणा केली असता अजितराव घोरपडे यांनी आपण तसे काही करणार नाही असे स्पष्ट केले.तसेच भाजप पक्षाच्या प्रमुख जबाबदार लोकांशी आपले संबध आलेले आहेत हे संबध आता दृढ झालेले आहेत.भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख झालेली आहे.शिवाय भाजप मजबूत पक्ष असून नेतृत्व खंबीर आहे.असे ही ते म्हणाले.

     भाजपमधून उमेदवारी न मिळाल्यास आपण अपक्ष निवडणूक लढवणार का अशी विचारणा केली असता,अजितराव घोरपडे यांनी भाजपची उमेदवारी मिळाली तरच आपण निवडणूक लढवणार आहोत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार नाही असे ही स्पष्ट केले.आज भाजपमुळे अनेक विकास कामे मार्गी लागत असून भाजपने शेतीला पाणी हे धोरण प्रभावीपणे राबवल्यास तासगांव तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे असे ही अजितराव घोरपडे यांनी स्पष्ट केले.

     लोकसभा निवडणूकीत तासगांवचे खासदार व तासगांवचे आमदार असे चित्र पाहवयास मिळाले आहे याकडे लक्ष वेधले असता यापुढील चित्र वेगळे असेल असे स्पष्ट करून अजितराव घोरपडे म्हणाले,आपण निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर सहकार्याचा जास्तीत जास्त वाटा काकांनी उचलावा असे ही सांगितले.तासगांव तालुक्यातील जनता सत्तेच्या प्रवाहात राहणारी आहे,आज राष्ट्रवादी स्वतःच्या बळावर काही करू शकेल अशी परिस्थिती नाही असे सांगून अजून किमान 25 वर्षे भाजप सत्तेत राहणार आहे त्यामुळे एवढी वर्षे कोण वेगळया प्रवाहात राहणार नाहीत असे ही अजितराव घोरपडे म्हणाले.

       यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ.पी.के.पाटील,नगराध्यक्ष डॉ.विजय सावंत,पक्षप्रतोद अनिल कुत्ते,नगरसेवक बाबासाहेब पाटील,जाफर मुजावर,माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील,विलासभाऊ पाटील,अनिल जाधव,नगसेवक सुनिल माळी,पांडुरंग पाटील,भारत डुबोले, आदी उपस्थित होते.

Related posts: