|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उपसरपंचपदी निवडीत सरपंच गटाला धक्का

उपसरपंचपदी निवडीत सरपंच गटाला धक्का 

वार्ताहर/ कोडोली

संभाजीनगर ग्रामपंचायतीच्या  उपसरपंचपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधारी सरपंच यांच्या उमेदवाराचा पराभव करुन उपसरपंचपदी मनिषा नंदकुमार नलवडे या विजयी झाल्या. दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनाबरोबर घेऊन संभाजीनगर ग्रामपंचायत जिह्यात एक नंबरची आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सौ. नलवडे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

संभाजीनगर ग्रामपचायत 17 सदस्यांची आहे. सरपंच-उपसरपंचांचा ठरलेला कार्यकाल संपल्याने काही महिन्यांपुर्वी सातारा येथील विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमवेत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक होवून सरपंच, उपसरपंच यांनी राजीनामा देवून नव्यांना संधी द्या, असे ठरले होते. खासदारांचा आदेश मानून उपसरपंच सुभाष मगर यांनी राजीनामा दिला. परंतु सरपंच दीपाली पंडित यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये तीव्र नाराजी होती. ग्रामपंचायत सदस्य जयवंत मोरे व अनिल पिसाळ यांनी जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, माजी पं.स. सदस्य आनंदराव कणसे, माजी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सतीश माने व सुभाष मगर यांच्यात मनोमीलन घडवून आणत त्यांनी सरपंचगटाला चांगलीच चपराक दिली. सत्ताधारी सरपंचांच्या कार्यपद्धतीबाबत नाराज असलेले 11 सदस्य एकत्र आले. उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवारी सरपंच दीपाली पंडित यांच्या अध्यक्षतेखाली गुप्तमतदान होवून पार पडली. या निवडणुकीत सरपंच गटाचे उमेदवार सागर जाधव यांना 6 मते तर प्रतिस्पर्धी मनिषा नलवडे या 11 मते मिळवून विजयी झाल्या.

सौ. नलवडे यांच्या निवडीबद्दल खासदार उदयनराजे भोसले, सुनील काटकर, अर्चना देशमुख, आनंदराव कणसे, सतीश माने, नितीन शिंदे, आप्पा गोरे, नंदकुमार नलवडे, प्रविण धस्के, सुभाष मगर, जयवंत मोरे, अनिल पिसाळ, अमित पवार, अशोक लोहार, जया वीर, रंजना वेदपाठक, सरिता सोनमळे, जयश्री जगताप, अलका कुंजीर व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Related posts: