|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » व्हीआयपी मोबाईल क्रमांकाच्या आमिषाने अभिनेत्रीच्या पतीला गंडा

व्हीआयपी मोबाईल क्रमांकाच्या आमिषाने अभिनेत्रीच्या पतीला गंडा 

ऑनलाईन टीम / कोलकाता :

प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांचे पती निखिल जैन यांना व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याच्या आमिषाने 45 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये एका टोळीने नागरिकांना मेसेज करुन व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याचे आमिष दाखविले. तसेच व्हीआयपीनंबरसाठी बँक खात्यात 45 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. या मेसेजची कोणतीही शाहनिशा न करता जैन यांनी संबंधित बँक खात्यात पैसे जमा केले. मात्र, व्हीआयपी मोबाईल नंबर न मिळाल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोलकाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जैन यांच्यासह अन्य जणांनाही अशाचप्रकारे गंडा घातल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Related posts: