|Saturday, October 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मल्टीपल रियर कॅमेराचा गोलाकर सेटअप आता नोकीयात

मल्टीपल रियर कॅमेराचा गोलाकर सेटअप आता नोकीयात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नोकीया मोबाईल कंपनी मल्टीपल रियर कॅमऱयांचा गोलाकार सेटअप असलेला स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार आहे.

या स्मार्टफोनचे फोटो वीबो या चीनच्या सोशल मिडिया साइटवर व्हायरल झालेत. लीक झालेल्या फोटोसमध्ये ‘नोकिया डेअरडेव्हिल’ असे या मोबाईलचे नाव असल्याचे समजते. या फोनमध्ये डय़ुअल कॅमेरा सेटअप असून याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. मल्टीपल रियर कॅमरा सेटअप असणाऱया स्मार्टफोन्समध्ये कॅमेरे एका रांगेत सरळ अथवा आडवे किंवा चौकोनाकृती बसवलेले असतात. मात्र, नोकीयाच्या नवीन स्मार्टफोनमध्ये हा सेटअप चक्क गोलाकार असणार आहे.

या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रगन एसओसी प्रोसेसर, अँड्रॉइड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टिम, स्नॅपडैगन 710 किंवा स्नॅपड्रगन 730 चिपसेट, यूएसबी-सी पोर्ट आणि डेडिकेटेड गुगल असिसटंट बटन देण्यात आले आहे.