|Sunday, October 20, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 7 जुलै ते 13 जुलै 2019

मेष

सूर्य नेपच्यून त्रिकोण योग, शुक्र, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात मिळते- जुळते धोरण ठेवा. वाद होईल. काम हातचे जाऊ शकते. कायद्यात राहून बोलणे करा. राग वाढेल. सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकवता येईल. जवळच्या लोकांचे विचार ऐकून घ्या. दौऱयात यश मिळेल. धावपळ होईल. मन अस्थिर राहील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. शेतकरी वर्गाचा संभ्रम वाढू शकतो.


वृषभ

सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यात मेहनत घ्या. काम मिळेल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. मागील येणे वसूल करा. शेतकरी वर्गाला चांगली संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांची मर्जी तुमच्यावर राहील. नवीन ओळखी तुमच्या क्षेत्रात होतील. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. परदेशात जाता येईल. नोकरीत जम बसेल. कोर्टकेस संपवा.


मिथुन

बुध, मंगळ युती, शुक्र, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. जमिनी संबंधी काम होईल. परंतु  सप्ताहाच्या शेवटी क्षुल्लक वाद संभवतो. राजकीय, सामाजिक कार्यास प्रति÷ा मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. घरगुती कामे होतील. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. शेतकरी वर्गाला पेरणीची संधी मिळेल. नवीन प्रयोग करता येईल. घर खरेदी विक्रीत फायदा होईल.


कर्क

चंद्र, बुध लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यात तुम्ही लक्ष द्या. अपमान- मान याकडे लक्ष न देता काम करा. काम मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात नमते धोरण ठेवा. दादागिरी नको. रागाने वागू नका. तुमची प्रति÷ा सांभाळा. घरगुती समस्या नकोशा वाटतील. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. यश हातून सटकू शकते. कोर्टकेस सोपी नाही. क्षुल्लक कारणाने अडचण  येऊ शकते.


सिंह

सूर्य, नेपच्यून त्रिकोण योग, शुक्र, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात ताण, तणाव होईल. तुमचे बोलणे वादग्रस्त ठरेल. संसारातील समस्या सोडवता येईल. घर, जमीन इ. खरेदी विक्री करता येईल. व्यवहारात सप्ताहाच्या शेवटी सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. लोकप्रियता मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. ओळखी होतील. कोर्टकेस जिंकाल. शेतकरी वर्गाला दिशा मिळेल.


कन्या

सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. रविवार मन अस्थिर होईल. वादविवाद होऊ शकतो. सोमवारपासून तुमची कामे पटापटा होतील. धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. लोकांची कामे करा. पुढील कठीण काळात त्याचा उपयोग होईल. घरातील व्यक्ती खूष होतील. घर, जमीन घेता येईल. स्पर्धेत जिंकाल. कोर्टकेस संपवा. व्यसन करू नका.


तुळ

शुक्र, हर्षल लाभयोग, सूर्य, नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. सोमवार, मंगळवार क्षुल्लक अडचणी येतील. जिद्द ठेवा. धंद्यात जम बसेल. वेळेला महत्त्व द्या. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांच्याबरोबर संबंध चांगले होतील. मैत्री होईल. लोकांची कामे प्रामाणिकपणे करा. शेतकरी वर्गाला चांगला फायदा होईल. कामे योग्य सल्ल्याने पुढे नेता येतील. शेअर्सचा अंदाज घेता येईल. कला, क्रीडा साहित्यात प्रेरणा मिळेल.


वृश्चिक

बुध, मंगळ युती, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. बुधवार, गुरुवार तुमच्यावर मानसिक दबाव येईल. वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. स्वत:ची प्रकृती सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात सौम्य धोरण ठेवा. आपसात वाद होऊ शकतो. धंद्यात वाढ होईल. व्यवहारात लक्ष ठेवा. अरेरावी कुठेही करू नका. स्पर्धेत कष्ट घ्या. जास्त अपेक्षा ठेवू नका. शेतकरी वर्गाचा गोंधळ होऊ शकतो.


धनु

साडेसाती सुरू आहे. सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. शुक्रवार, शनिवार धंद्यात अडचणी येतील. फसगत होऊ शकते. बोलताना सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव  वाढेल. लोकप्रियताही मिळेल. महत्त्वाची कामे करून घ्या. घरातील व्यक्तींना खूष करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळखी होतील. काम मिळेल. मुले आनंद देतील. केसमध्ये प्रगती होईल.


मकर

चंद, बुध लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. संसारात तणाव होऊ शकतो. जीवनसाथी, मुले यांच्याबरोबर गैरसमज होईल. धंद्यात वाढ करता येईल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यास तुमच्यावर टीका होईल. स्पर्धेत जिंकणे सोपे नाही. कोर्टकेसमध्ये बेसावध राहू नका. शेतकरी वर्गाने विचार करून निर्णय घ्यावा.


कुंभ

सूर्य, नेपच्यून त्रिकोण योग, शुक्र, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात सोमवार, मंगळवारी अडचण येईल. बोलण्यातून वाद होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकप्रियता मिळेल. दौऱयात यश मिळेल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. लिखाणाला नवा विषय मिळेल. शेतकरी वर्गाला योग्य मार्ग मिळेल. कामगारांना सांभाळून घ्या.


मीन

चंद्र, बुध लाभयोग, बुध, मंगळ युती होत आहे. बुधवार, गुरुवार दगदग होईल. क्षुल्लक अडचण येईल. धंद्यात वाढ होईल. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकार मिळेल. नवीन ओळखी होतील. घरातील कामे होतील. घर, जमीन, खरेदी- विक्रीत फायदा होईल. कला- क्रीडा क्षेत्रात जिद्द ठेवा. कोर्टाच्या कामात सावध रहा. शेतकरी प्रगती करेल.