|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पावसामुळे पन्हाळा तालुक्मयात घरांची पडझड : 70 हजाराचे नुकसान

पावसामुळे पन्हाळा तालुक्मयात घरांची पडझड : 70 हजाराचे नुकसान 

प्रतिनिधी/ पन्हाळा

पन्हाळा तालुक्मयाला गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्मयात गेल्या 24 तासात अंदाजे 278 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे घरांची पडझड होऊन अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.

गेल्या 24 तासात तालुक्मयातील पश्चिम भागातील बाजारभोगाव येथे सर्वाधिक 72 मि.मी तर सर्वात कमी पूर्व भागात कोडोली येथे 17 मि.मी पावासाची नोंद झाली आहे. पन्हाळा येथे 68 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. वाडीरत्नागिरी 35 मि.मी, कळे 27 मि.मी, कोतोली 36 मि.मी, पडळ 23 मि.मी अशा एकूण 278 मि.मी पावसाची नोंद तालुक्मयात झाली आहे.

गोलिवडे येथील ज्ञानू रामा पाटील यांच्या कच्च्या घराची भिंत पडून 50 हजार रुपये तर पन्हाळय़ातील शंकर पवार यांच्या घराची पडझड होऊन अंदाजे 20 हजारांची नुकसान झाले आहे. पावसामुळे तालुक्मयातील वारणा, कुंभी, कासारी, जांभळी, धामणी नद्यांच्या पाण्याच्या पात्रात वाढ झाली आहे. पन्हाळा शहरात जोरदार वाऱयामुळे विद्युततारा रस्त्यावर पडून काही भागात विद्युतपुरवठा उद्या सकाळपर्यंत बंद राहणार आहे.

Related posts: