|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » तेजश्री म्हणतेय ‘अग्गंबाई सासूबाई’

तेजश्री म्हणतेय ‘अग्गंबाई सासूबाई’ 

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. इतकेच नव्हे तर ती महाराष्ट्राची लाडकी व आदर्श सून बनली. त्यानंतर तेजश्रीने चित्रपटात आणि नाटकात काम केले. त्यामुळे छोटय़ा पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला. पण तेजश्रीच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. तेजश्री पुन्हा एकदा छोटय़ा पडद्याकडे वळणार आहे. झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या आगामी मालिकेत तेजश्री मुख्य भूमिकेत दिसेल. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसतील. दिग्गज कलाकारांचा मेळ असलेली ही मालिका नक्कीच रंजक असेल यात शंकाच नाही. ही मालिका 22 जुलैपासून रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचाच अर्थ ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल.  

Related posts: