|Sunday, October 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » विठ्ठल भेटी आधी दीप्ती-कार्तिकीला चाहत्यांकडून प्रेमळ भेट

विठ्ठल भेटी आधी दीप्ती-कार्तिकीला चाहत्यांकडून प्रेमळ भेट 

विठ्ठल माउलीचे भक्त सध्या पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी निघाले आहेत. ‘झी टॉकीज’वरील ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका दीप्ती भागवत आणि कार्तिकी गायकवाड सुद्धा आषाढीच्या वारीत सहभागी झाल्या आहेत.  विठ्ठल भेटीसाठी निघालेल्या वारकऱयांसोबत जाणाऱया या दोघींना वारीत अनेक चाहते सुद्धा भेटत आहेत. या वारीत सहभागी झालेली मंडळी ठिकठिकाणी या दोघींना थांबवून त्यांच्यासह फोटो आणि सेल्फी काढत आहेत. वारकऱयांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीसदेखील यात मागे नाहीत. आपले काम चोख बजावत असताना दीप्ती आणि कार्तिकीसह फोटो काढण्याचा मोह पोलिसांना सुद्धा आवरत नाही, हे दिसून येत आहे.