|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कलेक्टर ऑफीस करतेय खड्डय़ांतून स्वागत

कलेक्टर ऑफीस करतेय खड्डय़ांतून स्वागत 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालय चौक खड्डय़ांमुळे अपघाताला कारणीभूत ठरला आहे. महावीर गार्डन आणि उद्योग भवन यांच्यामधील रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाचे पाणी खड्डय़ात साचल्याने वाहतुकीची कोंडी होत आहेत. त्यातून होणाऱया अपघातांमुळे वादाचे प्रसंग घडत आहेत. कलेक्टर ऑफीस नागरीकांचे खड्डय़ांद्वारे स्वात करत असल्याची प्रतिक्रिया आहे.

बसंत बहार टॉकीज ते नागाळा पार्क या मार्गावर महावीर गार्डन, जिल्हाधिकारी कार्यालय, उद्योग भवन आहे. या मार्गावर पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही. कलेक्टर ऑफीसच्या संरक्षक भिंतीला लागून गटर आहे. पण तीही गाळाने भरलेली आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर या मार्गावर चौकात पाणी साचून रहाते. त्यातूनच चौकातील रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ातून जाणाऱया दुचाकी, कारची चाकेही दिसत नाही, इतके ते खोल आहेत. दुतर्फा दलदल आहे. त्यामुळे पाण्यात, खड्डय़ात वाहने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत.

खानविलकर पेट्रोल पंपानजिक ड्रेनेजचे काम सुरू असल्याने हा रस्ता बंद आहे. त्याचाही ताण या रस्त्यावर आहे. या मार्गावरील सततची वाहतूक कोंडी, रस्त्याची चाळण, खड्डय़ांमुळे पाणी उडाल्याने होणाऱया वादांमुळे या मार्गावरील खड्डे भरण्याची मागणी वाढत आहे.

 

Related posts: