आग्य्रात बसच्या भीषण अपघात 29 ठार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस आग्य्राजवळील झरना नाल्यात कोसळली.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीस प्रवाशांना घेऊन ही बस लखनऊहून दिल्लीला जात होती. पहाटेच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस आर्ग्य्राजवळील झरना नाल्यात कोसळली. त्यामध्ये 29 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात काही महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस अवध आगाराची होती. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Related posts:
Posted in: leadingnews