|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मोक्का प्रकरणात सांगलीच्या आरोपीला डिफॉल्ट जामीन

मोक्का प्रकरणात सांगलीच्या आरोपीला डिफॉल्ट जामीन 

पुणे / वार्ताहर : 

पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मोक्का) प्रकरणात एकाला डिफॉल्ट जामीन मिळाला आहे. साक्षीदारांवर दबाव टाकायचा नाही आणि नियमितपणे न्यायालयात हजेरी लावण्याच्या अटीवर विशेष न्यायाधीश ए.एन.सिरसिकर यांनी हा जामीन मंजूर केला.

रोहित जगन्नाथ आवळे (वय 24, रा. सांगली) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. भालचंद्र पवार आणि योगेश पवार यांनी काम पाहिले. विनायक श्रीकांत आलदर (वय 32, रा. सांगली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 20 डिसेंबर 2018 रोजी सांगली येथे ही घटना घडली. पानपट्टीतील घेतलेल्या माव्याचे पैसे मागितल्याने फिर्यादी आणि त्यांच्या भावावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात आवळेला अटक केली आहे. मोक्का कायद्यानुसार 180 दिवसात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल न केल्याने त्याने ऍड. भालचंद्र पवार आणि ऍड. योगेश पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.