|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मॅकेनिकल इंजिनिअरच्या मारहाणीत मनोरुग्णाचा मृत्यू

मॅकेनिकल इंजिनिअरच्या मारहाणीत मनोरुग्णाचा मृत्यू 

पुणे / प्रतिनिधी  : 

मेकॅनिकल इंजिनिअरने जिन्यावरुन ढकलल्याने डोक्याला मार लागून एका मनोरुग्णाचा मृत्यू झाला. संबंधित मनोरुग्णाने आरोपीच्या आईशी शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरुन आरोपीने त्याच्याशी झटापट केली. या झटापटीत मनोरुग्ण जिन्याच्या कठडय़ावरुन खाली पडला. त्याच्यावर ससून रुग्णालयाच उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधचा गुन्हा दाखल झाला आहे.

अनिल रामचंद्र पगारे (52,रा.जनवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयूर उर्फ गणेश ज्ञानेश्वर राहणे (30,रा.जनवाडी) याला अटक करण्यात आली आहे. सिमा अनिल पगारे(42) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे पती अनिल आणि आरोपी मयूर समोरासमोर राहतात. तीन जुलैला अनिल याने वेडाच्या भरात मयूर याच्या आईस शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरुन मयूरने अनिल याच्याबरोबर हुज्जत घालून शिवीगाळ केली. यानंतर झालेल्या झटापटीत त्याच्या जिन्याच्या कठडय़ावरुन ढकलून दिले. यामध्ये कठडय़ावरुन खाली पडल्याने अनिल गंभीर जखमी झाले. त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर.एस.सरडे करत आहेत.