|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मावळंगेत दुचाकीवरील दोघांवर बिबटय़ाचा जीवघेणा हल्ला

मावळंगेत दुचाकीवरील दोघांवर बिबटय़ाचा जीवघेणा हल्ला 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील मावळंगे बौद्धवाडी येथे दुचाकीवरून जाणाऱया दोघा चुलत भावांवर बिबटय़ाने जीवघेणा हल्ला करून जखमी केल़े ही घटना सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास घडल़ी गेल्या काही दिवसात या परिसरात बिबटय़ांची दहशत असून सोमवारच्या घटनेने त्यात वाढ झाली आहे.

योगेश विलास जाधव (30) व विक्रांत दिपक जाधव (17, ऱा दोघेही मावळंगे, बौद्धवाडी) हे दोघे बिबटय़ाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश व विक्रांत हे सोमवारी सकाळी दुचाकीवरून मावळंगे येथून गावखडी फाटा येथील व्यायामशाळेत जात होत़े यावेळी मावळंगे बौद्धवाडी येथे झुडूपातून बिबटय़ाने झेप घेत त्यांच्यावर हल्ला केल़ा अचानक झालेल्या या प्रकाराने दोघेही दुचाकीसह रस्त्यावर कोसळल़े अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या या दोघांनी आरडा ओरड सुरु केली. दरम्यान पुन्हा एकादा बिबटय़ाने या दोघांवर हल्ला चढवल़ा यावेळी प्रसंगवधान दाखवत या दोघांनी दुचाकीचा वापर आपल्या बचावासाठी करत दुचाकी बिबटय़ाच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न केल़ा

या दोन्ही भावांनी जीवांच्या आकांताने प्रतिकार केल्याने बिबटय़ाने तेथून पळ काढल़ा मात्र बिबटय़ाने दोन्ही भावांच्या पायावर, पाठीवर बिबटय़ाने आपल्या पंजाने हल्ला करून जखमी केल़े स्थानिक ग्रामस्थांनी रक्तबंबाळ झालेल्या या दोघा भावांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केल़े या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास करण्यात येत आह़े

परिसरात घबराटीचे वातावरण

गेल्या काही दिवसांपासून पावस, पूर्णगड दशक्रोशीत सातत्याने बिबटय़ाचे हल्ले होत आहेत. साधारणत: सकाळच्या सुमारास या घटना होत आहेत़ यामध्ये भाजी विकणाऱया महिलेवर व रेल्वे स्टेशनला मित्राला सोडायला जाणाऱया लिंगायत नामक व्यक्तीवर हल्ला करून बिबटय़ाने जखमी केले होत़े नुकतेच नाखरे गावातील एका घरामध्ये बिबटय़ाचा बछडा आढळून आला होत़ा त्यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आह़े

ग्रामस्थांकडून बंदोबस्ताची मागणी

पावस दशक्रोशीत सातत्याने बिबटय़ाचे हल्ले होत आहेत़ ज्या ठिकाणी हल्ले झाले आहेत तेथे महिला व शाळेत जाणारी मुले येत-जात असतात़ त्यामुळे वनविभाग कुणाच्यातरी मरणाची वाट पाहत आहेत काय असा संतप्त सवाल करत या बिबटय़ाचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ‘तरूण भारत’ जवळ बोलताना व्यक्त केल़ी