|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पायी दिंडीतील बालिकेचा अपघातात मृत्यू

पायी दिंडीतील बालिकेचा अपघातात मृत्यू 

वार्ताहर/  बेंबळे

सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या पायी दिंडीतील बालिकेचा दिंडीतील मालट्रकखाली चिरडून करूण अंत झाल्याची घटना बेंबळे (ता.माढा) येथे सोमवारी सकाळी 10 वा.च्या सुमारास घडली. याघटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धुळे जिह्यातील बुरजड येथील सिद्धेश्वर महाराज पायी दिंडीत मनिषा रमेश होटगर (वय-8 वर्ष, रा.लोणखडे ता.साखरी जि.धुळे) ही बालिका तिच्या आजी पिताबाई बंडू होटगर यांच्याबरोबर दिंडीत पायी पंढरपूरला निघाली होती. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही दिंडी माढा तालुक्यातील बेंबळे येथील कदम वस्ती येथे सकाळी आली होती. यावेळी ती मालट्रकमध्ये (क्र. एम.एच-18-एम-9741) बसली होती. मालट्रक मागे सरत असताना तिने अचानक खाली उडी मारली. यावेळी ती मालट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा चिरडून जागीच अंत झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मालट्रकचा चालक दीपक एकनाथ पाटील (रा.बुरजड ता.जि.धुळे) याच्या विरोधात टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या घटनेचा प्रभारी एपीआय राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. विलास बनसोडे व पोहेकॉ. स्वामीनाथ लोंढे हे अधिक तपास करीत आहेत.