|Monday, February 24, 2020
You are here: Home » Top News » छत्तीसगडमध्ये चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा; शस्त्र हस्तगत

छत्तीसगडमध्ये चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा; शस्त्र हस्तगत 

ऑनलाईन टीम / सुकमा :

छत्तीसगडमधील सुकमा जिह्यात आज सकाळी डब्बाकोंटा परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. तर काही नक्षलवादी या चकमकीदरम्यान जखमी झाले. पोलिसांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रे ताब्यात घेतली आहेत.

सुकमा जिह्यातील डब्बाकोंटा परिसरात नक्षलवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली. दरम्यान पोलिसांनी परिसराला वेढा दिल्यानंतर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. तर काही नक्षलवादी जखमी झाले आहेत. पोलिसांकडून नक्षलवाद्यांना चोख प्रतिउत्तर देण्यात येत आहे.

 

Related posts: