|Saturday, February 29, 2020
You are here: Home » leadingnews » कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे भाजपचे बडे नेते : सिद्धरामय्या

कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे भाजपचे बडे नेते : सिद्धरामय्या 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कर्नाटकमधील राजकीय अस्थिरतेमागे राज्यातील भाजप नेतेच नाही तर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही हात आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

शनिवारी काँग्रेस-जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिला. त्यानंतर या आमदारांचे नाराजीनाटय़ दूर करण्यासाठी कुमारस्वामी सरकारमधील मंत्र्यांनीही राजीनामा दिला. मात्र, बंडखोर आमदारांनी मंत्रिपदाचीही ऑफर धुडकावून लावली आहे. त्या आमदारांना भाजपात प्रवेश करायचा आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. कर्नाटकातील राजकिय घडामोडींमागे राज्यातील भाजपाच्या नेत्यांसह राष्ट्रीय स्तरावरील नेते अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे.

Related posts: