|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » अखेर गायक हनी सिंगवर गुन्हा दाखल

अखेर गायक हनी सिंगवर गुन्हा दाखल 

 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

प्रसिध्द रॅपर-गायक हनी सिंगचे नवे गाणे ‘मखना’ यू-ट्यूबवर हिट ठरले आहे. मात्र या गाण्याच्या लिरिक्समुळे तो वादात सापडला आहे. पंजाब पोलिसांनी ‘मखना’ या गाण्यात अश्लील शब्दाचा वापर केल्याने हनी सिंह आणि निर्माता भूषण कुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी पंजाब राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि आता पंजाबी गायक जसबीर जस्सीने हनी सिंगवर गाणी गाण्यास बंदी घालण्याची मागणी केली होती.