|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » भाजप किंवा शिवसेनेने उमेदवारी दिल्यास मी लढण्यास तयार : सुरेखा पुणेकर

भाजप किंवा शिवसेनेने उमेदवारी दिल्यास मी लढण्यास तयार : सुरेखा पुणेकर 

पुणे / प्रतिनिधी : 

लावणीला आता पारंपरिक प्रेक्षक राहिलेला नाही. लावणी टिकविण्यासाठी मला लावणीसंदर्भातील प्रश्न विधानसभेत मांडायचे आहेत. यासाठी विधानसभा निवडणूक लढविण्याचा विचार असून, पुणे कंवा मोहोळ मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मंगळवारी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सांस्कृतिक कट्टा’ या कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी आपली राजकीय इच्छा बालून दाखविली. अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे या वेळी उपस्थित होते.

पुणेकर म्हणाल्या, माझ्या माध्यमातून लावणी अमेरिकेपर्यंत जाऊ शकते, तर विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी मी का जाऊ शकत नाही? यासंदर्भात मला अनेक राजकीय पक्षांनी विचारणा केली आहे. भाजप किंवा शिवसेनेने उमेदवारी दिल्यास मी लढण्यास तयार आहे. बदलते प्रेक्षक लक्षात घेऊन लावणीचा बाजही बदलला पाहिजे. लावणी जगविण्यासाठी ती पुढील पिढीपर्यंत नेणे गरजेचे असून यासाठी लावणी ऍकॅडमी सुरू करणार आहे. 

पुणेकर म्हणाल्या, लावणीच्या मेकअपशिवाय सुरेखा पुणेकरला कोणी ओळखत नव्हते. मात्र बिग बॉसमुळे मेकअपशिवायच्या सुरेखा पुणेकरला लोक ओळखायला लागले. बिग बॉसमुळेच माझा खरा चेहरा लोकांना कळला. तसेच माझी बिग बॉस फेम म्हणून नव्हे, तर लावणी कलावंत म्हणूनच ओळख रहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बिग बॉसच्या घरात मला मान मिळायचा. सगळेजण माझा आदर करायचे. मला घरात सगळय़ांनी आई मानले होते. हे बघून, किशोरी शहाणे माझ्यावर जळायची, अशी टीकाही पुणेकर यांनी केली. अभिजीत केळकर, वैशाली माडे, शिव यांना टॉप तीनमध्ये पाहत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.