|Thursday, February 20, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

गुरुपौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण

बुध. दि. 20 ते 16 जुलै 2019

16 व 17 जुलैच्या रात्री खंडग्रास चंद्रग्रहण होत आहे. उत्तराषाढा नक्षत्रावर धनू व मकर राशीत हे ग्रहण आहे.17 च्या पहाटे 1.32 वा. ग्रहण सुरू होत असून ते पहाटे 4.30 वा. संपेल. ग्रहण पर्वकाल  2 तास 58 मि. असून संपूर्ण भारतात हे ग्रहण दिसेल. 16 जुलैला दुपारी 4 पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बाकी माहिती पंचांगात  पहावी. चराचर सृष्टीवर सूर्य, चंद्र व इतर ग्रहांचा परिणाम होत असतो. निरनिराळय़ा राशीवर वेगवेगळे परिणाम होतात. ग्रहण काळात चंद्र अथवा सूर्य यांची प्रभावी किरणे पृथ्वीवर पोचू शकत नाहीत. त्यामुळे  मानवाची व सृष्टीची फार हानी होते. तसेच निसर्गावरही अनिष्ट परिणाम होतात. भूकंप, ज्वालामुखीचा उदेक, समुद्रात मोठय़ा लाटा निर्माण होतो.अचानक आगी लागणे, वणवे पेटणे, असे अनुभव येतात. तर शुभ परिणामात जगाचे कल्याणही होते. पीक चांगले येते, जमिनीतील पाण्याचा साठा वर येतो, नवनवे शोध लागतात, जनतेच्या कल्याणासाठी नवनवे कायदे अस्तित्वात येतात.  ग्रहणापूर्वी महिनाभर व नंतरही महिनाभर परिणाम होत असतात. ग्रहण सुटले म्हणजे परिणाम संपले असे होत नाही. काही रोगाचे जंतू चंद्रग्रहणात अतिशय प्रभावी परिणाम दाखवितात. ग्रहण काळात देवांची शक्ती कमी व आसुरी शक्तींचे प्राबल्य अधिक असते. ग्रहण काळात धार्मिक पुस्तकांचे वाचन मंत्र व स्तोत्र पठण, नामस्मरण, ओंकार साधना करावी. ग्रहण काळात दानधर्माचे फार महत्त्व आहे. दान देणारा व घेणाऱयाचे दोष जातात. यासाठीच ग्रहण संपल्यावर थंड पाण्याने स्नान करावे. समुद्राला सर्व तीर्थाचे ठायी प्रमुख मानलेले आहे. जगाच्या पाठीवर कोठेही ग्रहण होत असेल तरी त्याचा परिणाम कुंडलीत प्रकर्षाने जाणवतात. पूर्वजांचे  शाप जागृत होतात. जर त्रासून अथवा हालहाल होऊन कुणी मरण पावले असतील अथवा कुणाला त्रास दिला असेल, आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असेल, कुणाची इस्टेट लुबाडलेली असेल तर त्याचे आत्मे ग्रहण काळात जागृत होतात व ज्याने त्रास दिला आहे. त्याला छळण्यास सुरुवात करतात.  हल्लीच्या हायफाय लोकांना व देवधर्म न मानणाऱयांना लोकांना या गोष्टी पटणार नाहीत. न्यूटनच्या तिसऱया नियमाप्रमाणे प्रत्येक क्रिया व प्रतिक्रिया समान असतात व जे पेराल तेच उगवेल अथवा जसे कर्म तसे फळ या उक्तीप्रमाणे हे दोष प्रत्येकाच्या कुंडलीत दिसून येतात व ग्रहण योग एल तर त्याचे परिणाम ग्रहणकाणत त्वरित जाणवतात. ग्रहण म्हणजे शापीत योग हे लक्षात ठेवावे. आपल्या हातून  कुणावर अन्याय झाला असेल, त्रास दिला गेला असेल तर ते शाप काही काळापर्यंत वाट पहात थांबतात व योग्य वेळ येताच हा शाप प्रत्यक्षात उतरतो व आपसुकच आम्ही गेल्या जन्मी कोणते पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोग भोगण्याची वेळ आली असे शब्द तोंडातून बाहेर पडतात. यासाठीच ग्रहण काळातील पथ्ये कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करावा. अनेक नास्तिक लोक देखील ग्रहणाच्या शापीत योगामुळे त्रस्त झालेले व देवाधर्माकडे लागलेले पहाण्यात आहेत.

मेष

भाग्यात व दशमात  होत असलेले चंदग्रहण तुम्हाला मध्यम फलदायक आहे. प्रवास भाग्योदय हरवलेल्या व्यक्ती अथवा वस्तू सापडतील. नोकरीसाठी केलेल्या अर्जाला उत्तम प्रतिसाद मिळेल. जर कोठे पैसे अडकले असतील तर ते मिळू शकतील. कुणाकडे बाँड, कागदपत्रे, वगैरे दिला असाल तर ते काढून घेण्याचा प्रयत्न करा.

वृषभ

 तुम्ही कितीही हुषार असालात तरी अनवधानाने काही चुका होऊ शकतात. मन शांत ठेवूनच कामे करावी लागतात. आठव्या स्थानी होणारे चंद्र ग्रहण तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने क्लेशदायक राहील. पडझड, दुरुस्ती करताना नुकसान आर्थिक हानी असे प्रकार घडू शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत काळजीचे प्रसंग.


मिथुन

चंद्रग्रहण सातव्या व आठव्या स्थानी होत आहे. खरेदीसाठी नवनव्या खर्चाचे प्रसंग उदभवतील. काही व्यक्तींच्या अती चांगुलपणामुळे वैवाहिक जीवनात गैरसमज होतील. त्यामुळे काही योजना अथवा जागा बदलण्याचा प्रसंग येईल. महत्त्वाची कामे जपून करावीत. कुणाशीही व्यवहार करताना काळजी घेतल्यास अधिक चांगले.


कर्क

सहाव्या- सातव्या स्थानी होत असलेले चंद्रग्रहण तुम्हाला आर्थिक बाबतीत अत्यंत शुभ आहे. देण्याघेण्यातून निर्माण झालेले प्रसंग तडजोडीतून मिटतील.प्रखर शत्रू असले तरी ते थंड पडतील. धनलाभाचे अनेक योग, शुभ घटनांची मांदियाळी राहील. वाईटातून चांगले करणारे हे ग्रहण आहे. प्रवास व भागीदारी व्यवसाय असेल तर सांभाळावे लागेल.


सिंह

पंचमात होत असलेले खग्रास चंद्रग्रहण संमिश्र फलदायक आहे. संततीच्या दृष्टीने त्रासदायक पण शत्रुनाशाच्या दृष्टीने चांगले ठरेल. पूर्वजांची एखादी कला शिकला असाल तर त्यातून  फायदा होईल. मुलाबाळांच्या बाबतीत चिंतेचे प्रसंग. प्रेम प्रकरणे असतील तर मोठी निराशा पदरी पडेल. धोकादायक ठिकाणी जाणे टाळा. तसेच गुप्तशत्रूंच्या कारवायावर लक्ष ठेवा.


कन्या

सुखस्थानी होत असलेले खंडग्रास चंद्रग्रहण तुम्हाला काही बाबतीत सावध रहाण्यास सुचवित आहे. धनलाभ, प्रवास, कर्जफेड, नोकरी व्यवसायात यश या दृष्टीने चांगले योग. पण वास्तू दोष, नातेवाईकांशी वितंडवाद व लिखाणामुळे नको ते प्रसंग येऊ शकतील. कुणाच्याही सांगण्यावरून वास्तुत काही फेरबदल करू नका. तसेच नको ती अडगळ असेल तर ती काढा. सर्व पीडा दूर होतील.


तुळ

तृतीय स्थानी होणारे चंद्रग्रहण तुम्हाला संमिश्र फळ देणारे आहे. आर्थिक बाबतीत चांगले अनुभव येतील. पण कठीण व नको त्या कामाची जबाबदारी पडेल. शेजारी व नातेवाईकांच्या वागण्यात फरक जाणवेल. त्याचबरोबर हातून निसटलेली एखादी महत्त्वाची संधी पुन्हा मिळण्याचे योग. वास्तुत राहू संबंधित कोणतीही कामे करू नका.


वृश्चिक

चंद्रग्रहण आर्थिक बाबतीत सावध राहण्यास सुचवित आहे. उधार- उसनवार देणीघेणी कर्ज वगैरे प्रकरणी सावध राहणे आवश्यक. डोळय़ांची काळजी घ्यावी. वादावादी मध्यस्थी यापासून दूर रहा. महत्त्वाची कागदपत्रे इतरांच्या  हाती पडू देऊ नका. कोणतेही व्यवहार पूर्ण तपासून मगच करा. शेजारी व नातेवाईकांशी वादावादीचे प्रसंग टाळावेत.


धनु

तुमच्या राशीतच होणारे चंद्रग्रहण मानसिक स्थिती चंचल ठेवील. कोणताही ठाम निर्णय घेणे कठीण होईल. ग्रहण अत्यंत अशुभ आहे. आरोग्य, मानसिक स्थिती व प्रति÷sवर परिणाम करणारे हे ग्रहण तुम्हाला जरा त्रासदायक ठरेल. त्यासाठी सर्व बाबतीत सावध राहाणे. तुम्हाला हितावह ठरेल. धनस्थानावरही प्रभाव असल्याने आर्थिक व्यवहारात घोटाळे होण्याची शक्मयता.


मकर

बाराव्या स्थानी व तुमच्या राशीत होत असलेले चंद्रग्रहण अशुभ योगात आहे. पडझड, आर्थिकहानी, बदनामी, आरोग्यात बिघाड, गुप्त शत्रुचा त्रास, पूर्वकर्माचा शाप प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणारे तसेच गुप्त शत्रुपीडा वाढविणार आहे. सर्व बाबतीत सावध राहिलात तर काहीही त्रास होणार नाही, आर्थिक शारीरिक व कौटुंबिक बाबतीत शुभ अनुभव येतील.


कुंभ

लाभात व बाराव्या स्थानी होत असलेले – चंद्र ग्रहण सर्व बाबतीत शुभ फळ देणारे आहे. आर्थिक सुधारणा मित्र मंडळींचे सहकार्य तसेच प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या कामात उत्तम यश मिळेल. काही गैरसमज असतील तर ते नाहीसे होतील. स्वभावाचा  व ओळखीचा गैरफायदा घेण्याचा काहीजण प्रयत्न करतील.  यामुळे कुणाच्याही बोलण्यावर एकदम विश्वास ठेवू नका.


मीन

दशम व लाभस्थानी होत. चंद्र ग्रहण तुम्हाला  शुभ आहे. वरि÷ मंडळी खूष राहतील. नोकरी व्यवसायात नजर लागण्यासारखे यश मिळेल. पगारवाढ तसेच अपेक्षित ठिकाणी बदली स्थलांतर, आवडत्या क्षेत्रात कामाची संधी मिळेल. नोकरीत पदोन्नतीचे योग. आरोग्यात सुधारणा, तसेच पूर्वी झालेले गैरसमज दूर होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल.

Related posts: