|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बोरगाव परिसरात शेतीकामांना वेग

बोरगाव परिसरात शेतीकामांना वेग 

वार्ताहर/ बोरगाव

वाळवा तालुक्यातील बोरगावसह परिसरातील सर्व शेतकऱयांची शेती कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. उन्हाळ्यात एकही समाधानकारक पाऊस न झाल्याने पिके करपू लागली होती. असमाधानकारक पावसामुळे शेतकरी झाला अस्वस्थ झाला होता. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाच्या आगमनामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस झाला नव्हता. आता पावसाने सातत्य राखल्यामुळे लागणी, पेरणी, टोकणी, ऊस लागवड, खतांचा पावसाळी डोस देणे व अन्य कामांची लगबग सुरु आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी शेती कामांमध्ये व्यस्त झाला असून सोयाबीन, भुईमूग व अन्य धान्यांच्या टोकणीना वेग आला आहे. आडसाली ऊस लागण, वाकुरी करणे, नाकी करणे याच्यासह अन्य शेती कामे जोमाने सुरु आहेत.