|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत कराटे, तायव्कांदो किकचा विक्रम

सांगलीत कराटे, तायव्कांदो किकचा विक्रम 

प्रतिनिधी/ सांगली

   यशवंतनगर येथील न्यू हायस्कूल विद्यालयात झालेल्या विश्वविक्रमामध्ये 105 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

येथील जिद्द स्पोर्टस् फौंडेशनचे सचिव प्रथमेश लोंढे, साहील तापेकरी यांनी याचे आयोजन केले होते. यामध्ये कराटे, तायव्कांदोच्या विद्यार्थ्यांनी सलग तीस मिनिटे प्रंट कीक करत विश्वविक्रम प्रस्थापित केला. या रेकॉर्डची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुकमध्ये झाली. यात प्रत्येक विद्यार्थ्याने 919 कीक केल्या. एकूण 96 हजार 495 किक्स् झाल्या. एकाच दिवशी सांगली, पुणे, आकोला, पिंपरी, हिंजवडी, सोलापूर येथे याचे आयोजन करण्यात आले होते.

न्यू हायस्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक पुंभार, विशाल कांबळे, सुमेधा खेतमर, विजयश्री कदम, रतन ननावरे, आकाश व्हनकडे, शीतल संकपाळ, अथर्व पुंभारे, आरती रेळेकर, राणी माडगूळकर यांनी संयोजन केले.