|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आषाढीसाठी साकारला पर्यावरणपूरक विठ्ठल

आषाढीसाठी साकारला पर्यावरणपूरक विठ्ठल 

प्रतिनिधी, सातारा

लाखो वैष्णव भक्तांचे श्रध्दास्थान असणाऱया पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस संपूर्ण राज्यातील भाविकांना लागली आहे. शुक्रवारी आषाढी एकादर्शीला हा वैष्णवांचा मेळा दर्शन घेवूनच यात्रा पूर्ण करत असतो. 

मात्र सातारा शहरातच आषाढी एकादशीला एका आगळ्या वेगळ्या पर्यावरण पूरक विठ्ठलाचे दर्शन घडवणार आहेत दोन कला शिक्षक. येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील कला शिक्षक घन:श्याम नवले आणि संदीप माळी या दोन कलाकारांनी टाकावू रद्दी कागदातून शाळेच्या प्रवेशव्दारात खास आषाढी एकादशीच्या निमित्ताने पर्यावरण पूरक विठ्ठल साकारला आहे. 

हिरव्या पानांच्या सुरेख कलाकृतीतून हा विठ्ठल विटेवर उभा असून सार्या देशातच पर्यावरणाचे सामाजिक भान जपत धार्मिक सोहळे साजरे व्हावेत हीच या कलाकृतीमागील संकल्पना असल्याचे यावेळी या दोघांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल शाळेचे विश्वस्त व शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी मुख्याध्यापक सुनिल शिवले, उपशालाप्रमुख बी. एस. कांबळे, पर्यवेक्षक दिलीप रावडे, लता दळवी, निलम तिरमारे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षीकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.