|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हिंदू समाजाच्या बदनामीचे षडयंत्र थांबवा

हिंदू समाजाच्या बदनामीचे षडयंत्र थांबवा 

विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली लेखी मागणी

16   प्रतिनिधी/ सातारा

दिल्ली येथे 30 रोजी काही समाजाच्या गुंडांनी मंदिराची व मुर्तीची तोडफोड केली. देशभरात खोटय़ा व काल्पनिक मॉब लिंचींगच्या विरोधात प्रदर्शनाच्या नावावर हिंदू समाजाला टार्गेट केले जात आहे. हे षडयंत्र असून त्यामागे गुप्त यंत्रणांचा हात आहे. बदनामी करणाऱयांचा निषेध नोंदवत अशा घटना होवू नयेत, सातारा शांत रहावा अशी धारणा व्यक्त करत आपल्या मागण्यांचे निवेदन काही संघटनांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देताना रवीकुमार कोठावळे, जितू वाडकर, धनंजय शिंदे, दत्ताजी थोरात, विठ्ठल बलेशठवार, विकास गोसावी, जयदीप ठुसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, 30 जून रोजी दिल्ली येथे काही समाजाच्या लोकांनी मंदिराची व मूर्तीची तोडफोड केली. देशभरात खोटय़ा आणि काल्पनिक मॉब लिंचीगच्या विरोधात विरोध प्रदर्शनाच्या नावावर अनेक स्थानांवर हिंदू समाज, हिंदू संघटन, पोलीस, सुरक्षा दल यांच्यावर निशाणा साधला जात आहे. छत्तीसगड येथे एका काल्पनिक घटनेत हिंदू समाजाचा मानबिंदू असलेल्या जय श्रीराम या घोषणेला बदनाम करण्याचे षडयंत्र करण्यात आले. जय श्रीराम हा नारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल व हिंदूत्ववादी संघटना जगात कशा बदनाम होतील अशी व्यवस्था त्यांच्याकडून केली जात आहे. यामागे खऱया अर्थाने कोण आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. त्याच अनुषंगाने देशभरात बजरंग दलाने निवेदने देत तीव्र निषेध नोंदवला आहे. जिल्हाधिकाऱयांशी बोलताना रवीकुमार कोठावळे म्हणाले, जय श्रीराम म्हटल्याने अटक होते. हिंदुनाच टार्गेट केले जाते. बदनाम केले जात आहे. खरे आरोपी आहेत. त्यांना अटक करण्यात यावी. परवा पुण्याच्या जवळ दोन गाई पकडल्या. दलितांवर अत्याचार करणारे हिंदूत्ववादी नव्हते. बातमी मात्र दाखवली. देशात जे वातावरण कलुषित करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. जेणेकरुन शांतता प्रस्तापित राहील, अशी विनंती त्यांनी निवेदनात केली आहे.