|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Automobiles » ह्युंदाईची इलेक्ट्रिक ‘कोना’ कार भारतात लाँच

ह्युंदाईची इलेक्ट्रिक ‘कोना’ कार भारतात लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ह्युंदाई या प्रसिद्ध कार उत्पादक कंपनीने आपली बहुचर्चित ‘कोना’ ही इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केली आहे.

‘कोना’ ही इलेक्ट्रीक कार एसयूव्ही प्रकारात मोडते. या कारला स्टँडर्ड एसी सोर्समधून चार्ज केल्यास ही कार अवघ्या 57 मिनिटांत चार्ज होते. रेग्युलर चार्जरने ही कार 6 तास 10 मिनिटात चार्ज होते. एकदा चार्ज झाल्यावर ही कार 452 किलोमीटर धावते. या कारमध्ये 100 केव्हीची मोटर देण्यात आली आहे. ती 131 बीएचपीचे पॉवर इंजिन देते. ही कार केवळ 9.7 सेकंदात शून्य ते 100 किलोमीटर प्रती तास वेग पकडू शकते. या कारमध्ये 8 इंचाचा फ्लोटिंग टचस्क्रीन इनफोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे.

याशिवाय गाडीत इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट हे तीन ड्राइव्ह मोड देण्यात आले आहेत. कारमध्ये वन स्पीडचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारमध्ये होम चार्जर दिला जाणार असून गिऱहाईकांसाठी डीलरशीपमध्ये चार्जिंग स्टेशन लावण्यात येणार आहे. या गाडीची किंमत 25 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.