|Friday, October 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » पाच रिअर कॅमेऱयांचा ‘नोकिया 9 प्युअर ह्यू’ लाँच

पाच रिअर कॅमेऱयांचा ‘नोकिया 9 प्युअर ह्यू’ लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नोकिया मोबाईल कंपनीने पाच रियर कॅमेरे असलेला ‘नोकिया 9 प्युअर ह्यू’ हा स्मार्टफोन आज भारतात लाँच केला.

या स्मार्टफोनमध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनच्या मागील बाजूला 5 कॅमेरे आहेत. तसेच पुढील बाजुला एक कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 5.9 इंचाचा क्वाड एचडी प्लस, पोएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. इन डिस्प्ले फिंगरपिंट सेन्सर, वायरलेस चार्जिंग सपोर्ट, रियर कॅमेऱयात 12-12 मेगापिक्सलचे तीन मोनोक्रोम सेन्सर, सेल्फीसाठी फोन प्रंटमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आणि 3320 क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 49 हजार 999 रुपये इतकी आहे.

फ्लिपकार्ट आणि नोकियाच्या वेबसाईटवरून आजपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे. 17 जुलैपासून हा स्मार्टफोन मोबाईल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे.