|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » अचानक लहान मुलाने सुरू केलेली कार धडकली मालवाहू रेल्वेगाडीला

अचानक लहान मुलाने सुरू केलेली कार धडकली मालवाहू रेल्वेगाडीला 

 

दौड /वार्ताहर :

खामगाव (ता दौड) येथील रेल्वे फाटकावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता चार चाकी गाडी मालवाहू रेल्वेगाडीला घासली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार खामगाव फाटा येथे वाळकी (ता.दौड) येथील माने परिवार कारमध्ये कुटुंबासहित प्रवास करीत होते.

खामगाव रेल्वेफाटक येथे रेल्वे गाडी जाण्यासाठी गेट बंद करण्यात आले. तेव्हा गाडीमधील ड्रायव्हर हे काही कारणासाठी गाडीची चावी गाडीला ठेऊन खाली उतरले. तेवढय़ात शेजारील सीटवर बसलेल्या लहान मुलाकडून गाडीची चावी चालू करण्यात आली आणि गाडी फाटक तोडून पुढे जाणाऱया मालगाडीला धडकली. जोपर्यंत मालगाडी संपत नव्हती तोपर्यंत गाडी घासत होती. सुदैवाने गाडीमधील लहान बाळ आणि 3 महिला सुरक्षित आहेत.