|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » प्रार्थना बेहेरे आता वेबसीरिजमध्ये…

प्रार्थना बेहेरे आता वेबसीरिजमध्ये… 

 

ऑनलाइन टीम  /मुंबई : 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे कोणत्या चित्रपटात दिसणार याची प्रतीक्षा तिच्या चाहत्यांना होती. आता चाहत्यांची
प्रतीक्षा संपली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रार्थना एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. केवळ वेबसीरिजमध्येच नाही तर चित्रपटातही दिसणार आहे. प्रार्थना सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रार्थनाने आपला मोर्चा वेबसीरिजकडे वळवला आहे. तिचा पती अभिषेक जावकर चित्रपट आणि वेबसीरिजची निर्मिती करत आहे. या दोन्ही माध्यमांमध्ये ती झळकणार आहे. यामध्ये तिची काय भूमिका असणार आहे, हे अद्याप समजलेले नाही.

 

Related posts: