|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » कर विभागात लवकरच फेसलेस पडताळणी योजना

कर विभागात लवकरच फेसलेस पडताळणी योजना 

नवी दिल्ली 

  कर विभागाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस आल्यावर संबंधीतांना मोठे टेन्शन येते. कारण त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक फेऱया कर विभागात मारव्या लागतात. परंतु सध्या या गोष्टी बंद होणार असून सरकारकडून लवकरच फेसलेस पडताळणीची योजना चालू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस(सीबीडीटी) विभागाचे अध्यक्ष पीसी मोदी यांनी म्हटले आहे.

सर्वसामान्याना आपला कर  भरणे सोपे व्हावे यासाठी अनेक प्रकाराने गुंतागुत असणारी कर प्रक्रिया सोपी करण्यावर भर दिला जात आहे. त्यात प्री फाईल्स इनकम टॅक्स रिटर्नचा ही यात समावेश केला असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

13.35 लाख कोटीचे ध्येय

महसूल संकलनात आगामी काळात मोठी वाढ होणार असल्याने 2019-20 या कालावधीत जवळपास प्रत्यक्ष कर संकलनातून 13.35 लाख कोटीचे ध्येय साध्य करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मागील तीन वर्षात 15 ते 18 टक्क्यांनी महसूल संकलनात वाढ झाल्याची नोंद केली आहे.  जसे मागील वित्त वर्षात 11.37 लाख कोटी रुपयाचे प्रत्यक्ष कर संकलन झाल्याची नोंद करण्यात आली आहे.