|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » वॉलमार्टकडून फ्लिपकार्ट खरेदीनंतर फोन पे चा सकारात्मक प्रवास

वॉलमार्टकडून फ्लिपकार्ट खरेदीनंतर फोन पे चा सकारात्मक प्रवास 

देशातील टॉपच्या स्टार्टअप्समध्ये घेत आहे भरारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फोन पे ची स्थापना फ्लिपकार्ट सोडल्यानंतर तीन मित्रांकडून डिसेंबर 2015 मध्ये केली आहे. त्यानंतर काही दिवसातच म्हणजे नोव्हेंबर 2016 ला केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. देशातील ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला जगातील सर्वात मोठी रिटेल साखळीत कार्यरत असणाऱया वॉलमार्टने खरेदी केल्यावर त्यांना सोबत डिजिटल पेमेन्ट कंपनी फोन पे सोबत मिळाली होती. त्यांचा सध्याचा विस्तार पाहता मोठी झेप घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.

वेगळा विभागाची रचना

फ्लिपकार्ट बोर्डाने फोन पे प्रायव्हेट लिमिटेडला स्वतः एक नवीन विभाग किंवा शाखा स्वरुपात कार्यरत ठेवणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी जवळपास 1 अब्ज डॉलर्स(65 अब्ज रुपये) जोडण्याची योजना उभारली असल्याची माहिती ब्लूमबर्गच्या सुत्राकडून दिलेल्या माहितीमधुन स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

उंच भरारी

आगामी काही काळात फंड उभारणीचे काम पूर्ण होणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी फोन पे चे स्वतंत्र विभागाची उभारणी करण्यात येणार आहे. यात सर्वात मोठी हिस्सेदारी म्हणून नोंद होणार आहे. मागील काही दिवसामध्ये फोन पे च्या आधारे झालेले व्यवहार हे चार टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

फोन पे चे भाग्य

रिलायन्स जिओकडून स्वस्त डेटा उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केल्यावर अन्य विविध चिनी स्मार्टफोन कंपन्यानी भारतात उत्पादन घेण्यास प्रारंभ केला. याच कारणांमुळे स्मार्टफोन्सच्या किंमती स्वस्त झाल्या व याचाच लाभ फोन पे ला इंटरनेटचा वापर करणाऱयासाठी नफा झाला. तर फोन पे चे मूल्य 14 ते 15 अब्ज डॉलर (910 ते 975 अब्ज रुपय) पोहचणार आहे.

फोन पे चे मूल्य

फ्लिपकार्टने जवळपास 10 अब्ज डॉलर्सवर (650 अब्ज रुपये) इतके मूल्य निश्चित केले आहे.