|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » ऑईल गॅस पॉवर-धातुच्या कमजोर कामगिरीने घसरण

ऑईल गॅस पॉवर-धातुच्या कमजोर कामगिरीने घसरण 

सेन्सेक्सची 174 अंकानी घसरण, निफ्टी 11,498.90 वर बंद

वृत्तसंस्था/ मुंबई

नवीन सप्ताहातील सुरुवातीपासून मुंबई शेअर बाजारात अस्थिरतेचे वातारण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यात सोमवारी सर्वात मोठी म्हणजे सेन्सेक्सची 800 अंकापर्यत घसरण झाली तर मंगळवारी हलक्या प्रमाणात तेजी नोंदवली तर पुन्हा बुधवारी सेन्सेक्स व निफ्टीत घसरणीची नोंद करण्यात आली आहे. दिवशभरातील व्यवहारात 173 अंकानी सेन्सेक्सची घसरण होत 38,557.04 बंद झाला. तर दुसऱया बाजूला निफ्टीत 57 अंकानी कमजोर होत 11,498.90 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमधील व्यवहारात सेन्सेक्स 400 अंकापर्यत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. चढ-उताराचा प्रवास पहावयास मिळाला यात मुख्य कंपन्यांमध्ये 176.78 अंकानी घसरण होत 38,557.04 वर बंद झाला. व इंड्रा डे मध्ये 38,854.85 अशी सर्वोच्च कामगिरी व 38,474.66 ची कमीत कमी कामगिरीची नोंद केली आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 57 टक्क्यांनी कमजोर होत 11,498.90 बंद झाला. 

बुधवारी मुंबई बाजारात बजाज फायनान्समध्ये सर्वाधिक म्हणजे 4.91 टक्क्यांनी घसरणीची नोंद करण्यात आली. टाटा स्टील, टाटा मोटर्स, ऍक्सिस बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, हीरोमोटो कॉर्प, बजाज ऑटो आणि स्टेट बँक यांचे समभाग मात्र 2.94 टक्क्यांनी कमजोर झाल्याची नोंद करण्यात अलली. जूनमधील प्रवासी वाहन विक्रीत झालेली घट झाल्याचा प्रभाव ऑटो क्षेत्रात पहावयास मिळाला आहे.  सियामच्या अहवालात वाहन विक्रीतील घटीचा अहवाल सादर केला आहे. याउलट येस बँक, सन फार्मा, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक आणि पॉवरग्रिड यांचे निर्देशाक मात्र 1.81 टक्क्यांनी वधारल्याची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या क्षेत्रांची घसरगुंडी

बुधवारी दिवसभरातील व्यवहारत ऑईल ऍण्ड गॅस, पॉवर, धातू निर्मिती आणि ऑटो क्षेत्रातील निर्देशाकांत सर्वात मोठी घसरण झाल्याची नोंद करण्यात आली यामुळे मुंबई बाजारात घसरणीची नोंद करण्यात आली.